काँग्रेस आमदाराच्या जावयाने ६ जणांना चिरडलं : भीषण अपघातात सर्वांचा मृत्यू

Congress | दोघांचा जागीच तर ४ जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू
Gujrat Accident
Gujrat Accident ANI

आनंद : गुजरातमधील (Gujarat) आनंद जिल्ह्यातील सोजित्राजवळ भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. काल (गुरुवारी) रात्री उशिरा हा अपघात झाला असून यात तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदाराच्या जावयाने त्याच्या गाडीने बाईक आणि ऑटोला जोरदार धडक दिली, यात ६ जण चिरडले गेले. मृत्युमुखी पडलेले 3 जण एकाच कुटुंबातील आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना आनंदचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, रात्री उशिरा हा अपघात घडला. कार, ​​बाईक आणि ऑटो रिक्षामध्ये भीषण धडक होऊन ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात ऑटोवरील ४ जणांचा आणि दुचाकीवरील २ जणांचा मृत्यू झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, ४ जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

याशिवाय आमदार पुत्राच्या गाडीच्या चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार काँग्रेस आमदार पूनमभाई परमान यांचे जावई केतन पादियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

सध्या पोलिसांनी आमदार जावयांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून आमदार जावयाला अटक केली आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदाराच्या जावयावर भारतीय दंडसंहिता कलम ३०४ नुसार हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com