PM Robert Fico Attack
Robert Fico sarkarnama

PM Robert Fico Attack: धक्कादायक! स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर गोळीबार; चार गोळ्या झाडल्या

Slovakia : उपस्थित नागरिकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला त्यानंतर एकच धावपळ झाली. फिको यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
Published on

Slovakia : मध्य युरोपातील स्लोव्हाकिया देशाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर बुधवारी (ता.15) गोळीबार करण्यात आला. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हँडलोवा शहरातील हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर पंतप्रधान फिको यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात फिको गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागचा उद्देश समजू शकला नाही.

PM Robert Fico Attack
Mamata Banerjee News : ममतांकडून ‘इंडिया आघाडी’ला दिलासा; मोदी सरकारचा पराभव झाल्यास...  

हँडलोवातील हाऊस ऑफ कल्चर येथे सरकारची Government बैठक झाली होती. या बैठकीसाठी पंतप्रधान PM आले होते. बैठकीनंतर लोकांना संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. उपस्थित नागरिकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला त्यानंतर एकच धावपळ झाली. फिको यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या पोटात गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकप्रिय पंतप्रधान

राॅबर्ट फिको हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. मतदानामध्ये त्यांचा पक्ष 23 टक्के मते मिळवत विजयी झाला होता. फिको हे रशियाच्या बाजुने असल्याचे सांगितले जाते. युक्रेना सैन्य मदत कमी करणार असल्याची घोषणा करत ते चौथ्यांदा पंतप्रधान झाले होते.

PM Robert Fico Attack
CAA News : मोठी बातमी! सीएएद्वारे पहिल्यांदाच 14 जणांना भारतीय नागरिकता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com