CBI News : हाय प्रोफाइल लोकांना अटक होऊ शकते; ‘सीबीआय’चे कोर्टातच संकेत, नेत्यांना धडकी

Delhi Liquor Case : कथित दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात नुकतेच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आमदार मुलीला ईडीने अटक केली आहे.
CBI
CBISarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर सीबीआयने नेत्यांना धडकी भरवली आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणात हाय प्रोफाइल लोकांना अटक केली जाऊ शकते, असे संकेत सीबीआयने (CBI News) दिले आहेत. या प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर सुनावणीवेळी केंद्रीय तपास यंत्रणेने कोर्टात हा दावा केला आहे.

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी दिल्लीतील (Delhi) राऊस एव्हेन्यू कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सीबीआयकडून विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. योग्य प्रक्रियेच्या माध्यमातून तपास सुरू आहे. तपासात विलंब होत नाही, असे उत्तर सीबीआयने दिले आहे.

CBI
Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून बंगालसह गुजरात, यूपी, बिहारला दणका

सीबीआयने पुढे या प्रकरणात हाय प्रोफाइल लोकांना अटक केली जाऊ शकते, असेही म्हटले आहे. सिसोदिया हे संपूर्ण षडयंत्राचे सूत्रधार आहेत. त्यांच्याकडून संवेदनशील कागदपत्रे आणि पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला, त्याच दिवशी त्यांनी आपला फोन नष्ट केला होता, असे म्हणत सीबीआयने जामिनाला विरोध केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सिसोदियांच्या जामिनावर आता पुढील सुनावणी 22 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची ईडीकडूनही (ED) चौकशी सुरू आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आमदार के. कविता यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. तसेच आपचे (AAP) खासदार संजय सिंह हेही सध्या तुरुंगात आहेत.

ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाही (Arvind Kejriwal) आठ वेळा समन्स पाठवले आहे, पण ते एकदाही चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते चौकशीला गेल्यास ईडीकडून त्यांना अटक केली जाऊ शकते, असा दावा आपच्या नेत्यांकडूनच केला जात आहे. ईडीने पाठवलेली समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत चौकशीला हजर राहणार नसल्याचे उत्तर केजरीवालांकडून तपास यंत्रणेला दिले जात आहे.

त्याविरोधात ईडीने न्यायालयातही धाव घेतली आहे. तसेच केजरीवालांकडूनही त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआयने उल्लेख केलेली हाय प्रोफाइल व्यक्तींची अटक म्हणजे कुणाची, यावरून चर्चांना उधाण आले आहे.

R

CBI
Congress News : दहा वर्षांत डझनभर माजी मुख्यमंत्री, 50 बड्या नेत्यांचा काँग्रेसला राम राम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com