

Sonam Wangchuk News : सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा तुरुंगात बाहेर येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. लेहमध्ये हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली मागील पाच महिन्यांपासून अटकेत होते. केंद्र सरकारने वांगचूक यांची अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश देत त्यांची सुटका करण्यास सांगितले आहे.
26 सप्टेंबर 2025 पासून वांगचूक हे अटकेत होते. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या विरोधात त्यांच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे देखील ओढले होते. मात्र, अंतिम निकाल येण्याच्याआधीच केंद्र सरकारने माघार घेत वांगचूक यांची सूटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
लडाखला राज्याचा दर्जा प्राप्त व्हावे आणि सहावे परिशिष्ठ लागू व्हावे यासाठी सोनम वांगचूक हे आंदोलन करत होते. त्यात अनेक सामाजिक संघटना देखील सहभागी होत्या. मात्र, त्यांनी उपोषण देखील करत होते. त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसाचारात भाजपचे कार्यालय जाळण्यात आले होते. या हिंसाचारामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता तर, 90 जण जखमी झाले होते.
केंद्र सरकारडून या हिंसाचारासाठी वांगचूक यांना जबाबदार धरत त्यांच्या संस्थेची परवानगी रद्द केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तुरुंगात असताना त्यांची प्रकृती खालवल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.