Sonia Gandhi : सोनिया गांधींची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड ; खर्गेंनी मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर!

Congress Working Committee Meeting दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली यामध्ये पक्षाच्या पुढील रणनितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली गेली.
Sonia Gandhi
Sonia Gandhi Newssarkarnama

Congress Politics News : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी काँग्रेस संसदीय दलाची बैठक झाली. बैठकीत सोनिया गांधींची संसदीय दलाच्या नेत्या म्हणून निवड केली गेली. बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला सर्वानुमते मान्यता दिली गेली.

या बैठकीस सोनिया गांधी(Sonia Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रमोद तिवारी आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. याआधी शनिवारीच दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली होती. बैठकीत पक्षाच्या पुढील रणनितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली गेली.

Sonia Gandhi
Uttar Pradesh Lok Sabha Election : …तर 'यूपी'तील दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक! ही आहेत कारणं

बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेते पदासाठी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. खासदार गौरव गोगोई, तारिख अन्वर, के सुधाकरन यांनी या प्रस्तावस समर्थन दिले. यानंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारींनी माहिती दिली की, सोनिया गांधींना सर्वानुमते काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्षपदी निवडले गेले आहे.

दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निडणूक जिंकली आहे. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राहुल गांधी नेमकं कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आणि कोणता मतदारसंघ सोडणार? यावरून विविध अंदाजही वर्तवले जात होते.

Sonia Gandhi
Narendra Modi Vs Rahul Gandhi : आता सामना आमने-सामने; काँग्रेसचं ठरलं, राहुल गांधीच मोदींना भिडणार...

अखेर काँग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि राहुल गांधी तीन ते चार दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. मात्र राहुल गांधी वायनाडला सोडून रायबरेली मतदारसंघाचेच प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com