Mamata Banerjee TMC Formation : सोनिया गांधी, सिताराम केसरी ते प्रणब मुखर्जी.. काँग्रेसमधील दिग्गजांना नडून ममतांनी 'तृणमूल'ची स्थापना केली : हायव्होल्टेज ड्राम्याची इनसाईड स्टोरी

Why Mamata Banerjee left Congress : सोनिया गांधी, सिताराम केसरी आणि प्रणब मुखर्जी यांच्यासोबतच्या राजकीय संघर्षानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना कशी केली? जाणून घ्या या हायव्होल्टेज राजकीय नाट्याची संपूर्ण इनसाईड स्टोरी.
Mamata Banerjee TMC Formation
Mamata Banerjee TMC FormationSarkarnama
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या राजकारणात आज ज्या तृणमूल काँग्रेसचा दबदबा दिसतो, त्याच पक्षाची सुरुवात काँग्रेसमधील मतभेद आणि बंडखोरीतून झाली होती. मात्र, सध्या तृणमूल काँग्रेस अंतर्गत संघर्षाचा सामना करत असताना, अनेकांना पक्षाच्या स्थापनेमागील राजकीय घडामोडींची आठवण होत आहे. एकेकाळी काँग्रेसच्या तिकीटावर संसदेत पोहोचलेल्या ममता बॅनर्जी यांनीच पक्ष नेतृत्वाविरोधात उघडपणे भूमिका घेत स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली होती.

पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांचे नाव संघर्ष, बंडखोरी आणि राजकीय जिद्दीचे प्रतीक मानले जाते. आज त्याच तृणमूल काँग्रेस पक्ष आपल्या स्थापनेनंतरच्या सर्वात मोठ्या अंतर्गत संकटाचा सामना करत असल्याची चर्चा सुरू आहे. एकेकाळी हा पक्षही काँग्रेसविरोधातील बंडातूनच जन्माला आला होता. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाविरोधात उघड भूमिका घेत स्वतंत्र पक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून तृणमूल काँग्रेसची निर्मिती झाली.

Mamata Banerjee TMC Formation
CM Politics : शिवकुमारांनी जे पेरलं तेच आता उगवलं, विद्यमान उपमुख्यमंत्र्याचा 'CM' खुर्चीवर डोळा; तीन वेळा संधी हुकल्याची व्यक्त केली खंत

ममता बॅनर्जी राजकारणात सक्रिय

विद्यार्थी जीवनापासूनच ममता बॅनर्जी सक्रिय राजकारणात होत्या. सुरुवातीला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. 1984 मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभेवर निवडून येत खासदार बनल्या. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र, याच मुद्द्यावरून त्यांचे काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद वाढू लागले.

1990 च्या दशकात डाव्या आघाडीविरोधातील आंदोलनांमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. त्यावेळी त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. त्यांना वाटू लागले की काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व पश्चिम बंगालमधील त्यांच्या राजकीय मोहिमेला अपेक्षित पाठबळ देत नाही. राष्ट्रीय स्तरावर डाव्या पक्षांच्या समर्थनाची गरज असल्याने काँग्रेस त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.

Mamata Banerjee TMC Formation
Eknath Shinde Offer : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेसाठी ऑफर होती; पण मी फडणवीसांचा निष्ठावान सैनिक! रवी राणांच्या राजकीय फटक्याने महायुती ढवळून निघाली

90 च्या दशकात ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल काँग्रेसमधील एक धडाडीच्या नेत्या होत्या. मात्र, त्यांची पश्चिम बंगालमधील काँग्रेस युनिट आणि केंद्रीय नेतृत्वाशी सातत्याने खटके उडत होते. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सिताराम केसरी होते. ममतांनी बंगाल काँग्रेसचे अध्यक्षपद मागितले होते, मात्र केसरींनी सोमन मित्र यांना पाठिंबा दिला. यामुळे ममतांचा पक्षावरील विश्वास पूर्णपणे उडाला.

ममतांचा असा आरोप होता की, पश्चिम बंगालमधील काँग्रेस पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या (CPIM) हातचे बाहुले बनला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात वर्चस्वावरून नेहमी स्पर्धा असायची. ममतांना बंगालमध्ये डाव्या पक्षांना (Left) सत्तेवरून खाली खेचण्यासाठी थेट भाजपसोबत युती करायची होती, ज्याला प्रणव मुखर्जी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर तीव्र विरोध केला होता.

या वाढत्या मतभेदांमुळे ममता बॅनर्जी यांनी पक्ष नेतृत्वाला थेट आव्हान दिले. या वादाला पुढे मोठे स्वरूप आले आणि 1997 मध्ये काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुकुल रॉय यांच्यासह काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी नव्या राजकीय पक्षाची उभारणी सुरू केली. काँग्रेसमधील अंतर्गत वाद, ज्येष्ठ नेत्यांशी झालेली मतभेद आणि डाव्या पक्षांसोबतच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी हे बंड पुकारले होते. अखेर 1 जानेवारी 1998 रोजी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची अधिकृत स्थापना झाली आणि बंगालच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली.

तृणमूलच्या स्थापनेनंतर ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वतंत्र राजकीय शक्ती उभी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, पण जनतेशी असलेले नाते आणि सातत्यपूर्ण संघर्षामुळे पक्षाची ताकद वाढत गेली. कालांतराने तृणमूल काँग्रेस राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष बनला.

स्थापनेनंतर काही वर्षांतच तृणमूल काँग्रेसने स्वतःची ताकद सिद्ध केली. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत युती करून उल्लेखनीय यश मिळवले. त्यानंतर ममता बॅनर्जी केंद्रात रेल्वेमंत्रीही बनल्या. 2011 मध्ये काँग्रेससोबत आघाडी करत तृणमूलने पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांच्या 34 वर्षांच्या सत्तेला पूर्णविराम दिला.

Mamata Banerjee TMC Formation
Chhagan Bhujbal : साहेब निर्णय घ्या...! येवल्यात झळकले पोस्टर्स ; समर्थकांची नाराजी, छगन भुजबळ खरोखर निर्णय घेणार?

त्या निवडणुकीत आघाडीला 227 जागा मिळाल्या, त्यापैकी 187 जागा तृणमूल काँग्रेसच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसमधील मतभेदातून सुरू झालेला हा प्रवास पुढे बंगालच्या राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये गणला जाऊ लागला. आज ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हे पश्चिम बंगालच्या राजकीय समीकरणातील महत्त्वाचे केंद्रबिंदू मानले जातात.

यानंतर पक्षाने सलग निवडणुकांमध्ये विजय मिळवत सत्ता कायम राखली. मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. पक्षातील नाराजी, गटबाजी आणि बंडखोरीच्या चर्चांमुळे तृणमूल काँग्रेस कठीण टप्प्यातून जात असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या बंडखोरीतून या पक्षाचा जन्म झाला, त्याच प्रकारच्या अंतर्गत संघर्षाचा सामना आता पक्षालाच करावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com