Rahul Gandhi Vs PM Modi : 'दिन रात ‘झूठ की खेती’ करने वाले..' म्हणत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा!

Farmers Agitation News : जाणून घ्या, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी नेमकं काय म्हणाले आहेत.
Rahul Gandhi Vs PM Modi
Rahul Gandhi Vs PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi On Farmers Agitation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या न्याय यात्रा सुरू आहे. दरम्यान त्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर शेतकरी प्रश्नावरून जोरदार टीका केली. शेतमालाला आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याचा कायदा करावा, स्वामीनाथ आयोगाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी चलो दिल्लीचा नारा दिला असून, मंगळवारी (ता. 13) मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले, 'दिवसरात्र खोटं बोलणाऱ्या मोदींनी दहा वर्ष शेतकऱ्यांना केवळ फसवलं आहे. दुप्पट उत्पन्नाचे वचन देऊन मोदींनी अन्नदात्यांना MSPसाठी तिष्ठत ठेवलं. महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना पिकाचा योग्य मोबदला न मिळाल्याने, त्यांच्यावरील कर्जात 60 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी जवळपास 30 शेतकऱ्यांना रोज आपला जीव गमावावा लागला आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi Vs PM Modi
Farmers Protest : शेतकऱ्यांचे 'चलो दिल्ली; मोदी सरकारच्या अडचणी वाढणार?

याचबरोबर 'धोका ज्यांची USP आहे, ते MSPच्या नावावर शेतकऱ्यांबरोबर केवळ राजकारणच करू शकतात, न्याय नाही. शेतकऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे विश्वासार्ह नाहीत. त्यांना दिल्लीतून बाहेर फेका, शेतकऱ्यांना न्याय आणि नफा काँग्रेस देईल.' असंही राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना वर्षभर अहिंसक पद्धतीने ऐतिहासिक आंदोलन करत केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. 2020-2021 या कालावधीत झालेल्या शेतकरी आंदोलाची चर्चा जगभर झाली होती. आता पुन्हा शेतकरी एमएसपी साठी आक्रमक झाले असून, दिल्लीकडे निघाले आहेत.

Rahul Gandhi Vs PM Modi
Rajya Sabha Election 2024 : भाजपकडून राज्यसभेसाठी सात राज्यातील 14 उमेदवारांची घोषणा

2020-2021 मध्ये दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये (Farmers Protest) पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांचा (Farmers) मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या आंदोलनासाठी देखील या राज्यांमधून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सरकारने आपले उत्तर मंगळवारच्या आधी द्यावे,असे आवाहन शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्याच राज्यात रोखण्यासाठी हरियाणा सरकार प्रयत्न करत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com