Lucknow News : माजी मंत्री व सपा नेते आझम खान (Azam Khan) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाने त्यांच्या घरावर बुधवारी सकाळी छापा टाकला. लखनौ, रामपूर आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी हे छापे सुरू आहेत. या वेळी जोहर ट्रस्टसंदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आझम खानच्या जाेहर ट्रस्टमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत प्राप्तिकर विभागाने बुधवारी ही कारवाई केली असून, सकाळपासून त्यांच्या घरी छापे टाकले आहेत. (Latest Marathi News)
आयकर विभाग आणि ईडीने बुधवारच्या छाप्याबाबत अद्याप अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. छापेमारीच्या वेळी सपा नेते आझम खान त्यांच्या रामपूर येथील निवासस्थानी उपस्थित होते. आझम खान यांच्या रामपूर येथील निवासस्थानावरही आज बुधवारी (दि.१३ सप्टेंबर) सकाळी ७ वाजल्यापासून आयकर विभागाचे पथक छापे टाकत आहे. आझम खान यांच्या घराबाहेर आयकर विभागाच्या डझनभर वाहनांचा ताफा होता.
उत्तर प्रदेश सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला रामपूरमधील ३.२४ एकर भूखंडाची भाडेपट्टी रद्द केली होती. हा भूखंड या ट्रस्टला संशोधन संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने देण्यात आला होता. मोठ्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर असूनही संशोधन संस्थेचे बांधकाम होऊ न शकल्याने अनियमिततेचा आरोप झाल्यानंतर सरकारने ही कारवाई केली.
जोहर ट्रस्टशी संबंधित जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी आझम खान यांच्यावर खटले अजूनही न्यायालयात सुरू आहेत. या प्रकरणी आझम खान तुरुंगातही गेले होते. काही काळापूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
(Edited By-Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.