Municipal elections Result : काँग्रेसच्या सुनामीत भाजपची वाताहात; विधानसभा निवडणुकांआधी बसला मोठा धक्का, फडणवीसांनीही केला होता प्रचार

Congress wins Telangana : महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेलंगणातही प्रचारासाठी गेले होते.
Congress wins Telangana
Congress wins TelanganaSarkarnama
Published on
Updated on

BJP defeat News : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या भाजपची तेलंगणात वाताहात झाली आहे. तेलंगणात झालेल्या महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असून राज्यात सत्ताधारी काँग्रेसची जणू सुनामी आल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या सुनामीत भाजपची वाताहात झाली असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीलाही झटका बसला आहे.

तेलगणामध्ये सात महानगरपालिका आणि ११६ नगरपरिषदांसाठी मतदान पार पडले होते. राज्यात दोन वर्षांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. तसेच दक्षिणेकडील तमिळनाडू, केरळ आणि पुद्दचेरी या राज्यांमधील विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेवली आहे. त्यामुळे तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाला महत्व प्राप्त झाले आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने एकूण २ हजार ९९६ वॉर्डपैकी तब्बल १२०९ वॉर्डमध्ये विजय मिळविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बीआरएसला आतापर्यंत केवळ ६५२ जागा मिळविता आल्या आहेत. भाजपलाही २२० वॉर्डपर्यंतच मजल मारता आलेली आहे. अद्याप जवळ ७०० वॉर्डचे निकाल हाती यायचे आहेत. मात्र, तिथेही काँग्रेसच वरचढ ठरणार असल्याचे चित्र आहे.

Congress wins Telangana
Rahul Gandhi News : एकाचवेळी गेली 11 नेत्यांची खासदारकी; तोच प्रस्ताव राहुल गांधींचंही पद घालविणार?

काँग्रेसने २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या गेलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधकांना धूळ चारत दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपली पकड मजबूत केल्याचे मानले जात आहे.

Congress wins Telangana
Maharashtra Government : सरकारी कार्यालयात चाललाय, मग ही बातमी वाचाच; फडणवीसांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं वाढवलं टेन्शन...

महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेलंगणातही प्रचारासाठी गेले होते. त्यांनी तिथे सभाही घेतल्या होत्या. तसेच रोड शोही केला होता. यावेळी त्यांनी काँग्रेससह भारत राष्ट्र समितीवरही जोरदार हल्ला चढविला होता. मात्र, त्यांच्या प्रचाराचा तेथील मतदारांवरून फारसा प्रभाव पडला नसल्याचे निकालावरून दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com