Jagannath Rath Stampede : मोठी बातमी! श्रीजगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, तीन जणांचा मृत्यू

Stampede Three Dead : घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रशासनाने जखमींना तातडीने पुरी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Tragedy at Jagannath Rath Yatra: Three devotees die in stampede near Shri Gundicha Temple, Puri.
Tragedy at Jagannath Rath Yatra: Three devotees die in stampede near Shri Gundicha Temple, Puri.sarkarnama
Published on
Updated on

Jagannath Rath Stampede News : ओडीसातील पुरी येथील भगवान श्रीजगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान आज (रविवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. श्रीगुंडिचा मंदिरासमोर दर्शनासाठी जमलेल्या भाविकांमध्ये अचानक धक्काबुक्की होऊन चेंगराचेंगरी झालीय ज्यामध्ये तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आणि 10 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रशासनाने जखमींना तातडीने पुरी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना शरधाबली परिसरात घडली, जेव्हा रथावर विराजमान भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भक्त रथयात्रेसाठी पुरीत एकत्र आले होते. मात्र, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरले. धक्काबुक्कीत काही भाविक खाली कोसळले आणि तेच गर्दीत चिरडले गेले. मृतांमध्ये प्रभाती दास, बसंती साहू या दोन महिला व ७० वर्षीय प्रेमाकांत महांती यांचा समावेश आहे. सर्व मृतांची ओळख पटली आहे.

Tragedy at Jagannath Rath Yatra: Three devotees die in stampede near Shri Gundicha Temple, Puri.
Ajit Pawar: आधी बंगला नंतरच लग्न!अजितदादांनी सांगितला किस्सा

प्रशासन अपयशी

पुरीची रथयात्रा ही देशातील सर्वात मोठ्या धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही अशा धार्मिक आयोजनांतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या तयारीवर आणि गर्दी नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Tragedy at Jagannath Rath Yatra: Three devotees die in stampede near Shri Gundicha Temple, Puri.
Babanrao Lonikar politics: संतप्त शेतकरी संघटनेचा इशारा, आमदार बबनराव लोणीकर यांना नाक घासायला लावू!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com