Dhananjay Chandrachud : हे कोर्ट आहे, कॉफी शॉप नाही! सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर भडकले

Supreme Court CJI : एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वकिलांनी ‘Yeah, Yeah’ म्हटल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले.
Dhananjay Chandrachud
Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सुप्रीम कोर्टात एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड वकिलांवर चांगलेच भडकल्याचे दिसले. हे कोर्ट आहे, कोणते कॉफी शॉप नाही. मी सहन करणार नाही, असे म्हणत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्या वकिलाला झापले.

संबंधित याचिकाकर्त्या वकिलांनी निवृत्त सरन्यायादीश रंजन गोगोई यांच्याविरोधात चौकशीची मागणी एका याचिकेतून केली आहे. पण सीजेआय चंद्रचूड यांनी या केसमधून गोगोईंचे नाव हटवण्याचे आदेश दिले. एका न्यायाधीशांना प्रतिवादी करून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता, असा सवालही सरन्यायाधीशांनी केला.

Dhananjay Chandrachud
Ajit Pawar : विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; भाजपने आमदार फोडला...

सुप्रीम कोर्टात याचिकेवरील सुनावणीदरम्यान वकिलांनी इंग्रजीत ‘Yeah, Yeah’ असे म्हटले. हे ऐकून सरन्यायाधीश भडकले. ते म्हणाले, ‘हे कोणते कॉफी शॉप नाही. हे Yeah, Yeah काय आहे. मला अजिबात आवडणार नाही. कोर्टात याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.’ सरन्यायाधीश संतापल्याचे पाहून वकिलांनी नम्रपणे त्यांना सांगितले की, ‘आपण महाराष्ट्रातील आहोत. त्यामुळे असे बोलून गेलो.’ त्यानंतर मग सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना मराठीतून समजून सांगितले.

दरम्यान, गोगोई यांना प्रतिवाद केल्याबद्दल सरन्यायाधीश म्हणाले, एका न्यायाधीशांना प्रतिवादी करून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता? थोडा मान राखायला हवा. न्यायाधीशांविरोधात विभागांतर्गत चौकशी करण्याची मागणी तुम्ही करू शकत नाही. रंजन गोगी हे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होते. ते सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत.

Dhananjay Chandrachud
Amit Shah : अस्वस्थ खर्गे मोदींवर बरसताच अमित शाहांना आला राग; ‘ते’ शब्द लागले जिव्हारी...  

संबंधित वकिलांनी 2018 मध्ये गोगोईंच्या चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. माझी केस मजबूत असून कायदेही माझ्या बाजूने आहेत. पण गोगोई यांनी माझी याचिका फेटाळून लावली होती, असे वकिलांनी कोर्टात सांगितले. पण त्यानंतरही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गोगोई यांचे नाव याचिकेतून हटवण्यास सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com