मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? नार्वेकरांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण

Ashok Chavan News : अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदारही भाजपत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकींनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. ते भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ashok Chavan
Kolhapur Loksabha : कोल्हापुरात महायुती मास्टरस्ट्रोकच्या तयारीत; महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार

राहुल नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. या वेळी अशोक चव्हाणांनी नार्वेकरांकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं किंवा राज्यसभा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "पुढील काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार आहे. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही मिळणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. शरद पवार यांच्या पक्षाचीही हीच स्थिती आहे. वंचितमधील मोठे नेतेही भाजपत प्रवेश करणार आहेत," असं बावनकुळेंनी म्हटलं.

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर 'एपीबी माझा'शी संवाद साधताना म्हणाले, "अशोक चव्हाण भाजपत प्रवेश करतील, असं वृत्त आहे. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्याचंही मला कळलं आहे. पण, अधिकृत माहिती मिळाली नाही. ज्या पक्षानं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं तिथे अस्वस्थ असण्याचं कारण नाही. पण, अशोक चव्हाण भाजपत येण्याची भरपूर कारण आहेत. ते गेले अनेक दिवसांपासून भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे."

Ashok Chavan
Manoj Jarange : जरांगेंची प्रकृती खालावली, बसता येईना, आवाजही खालावला; सरकारला इशारा देत म्हणाले...

"भाजपत अशोक चव्हाणांचं स्वागत करतो, असं विधान पूर्वी दिलं होतं. मात्र, आजही अशोक चव्हाणांचं भाजपत स्वागत करतो. भाजपला कुणाचीही गरज नाही. पण, गरज असणारे भाजपत येतात," असं चिखलीकरांनी सांगितलं.

Ashok Chavan
Lok Sabha Election 2024 : हेमंत गोडसेंकडून लोकसभेचा प्रचार सुरू; पण भाजप अन् राष्ट्रवादीकडून गोंधळाचा प्रयत्न

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com