Supreme Court On Dhangar Reservation : मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षण याचिका फेटाळली

Dhangar Reservation News : काही महिन्यांपूर्वीच मुंबई हायकोर्टाने राज्यातील एस. टी.आरक्षणापासून प्रवर्गातून आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दर्शवला होता.
Dhangar Samaj Reservation
Dhangar Samaj Reservation sarkarnama

New Delhi News : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा,ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे.आंदोलने, मोर्चे, सभा, मेळावे, बैठका यांनी वातावरण ढवळून निघालं होतं. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडत सरकारला आव्हानही दिले जात आहे. यामुळे शिंदे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

याचदरम्यान, धनगर समाजाकडूनदेखील अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढत आक्रमक पवित्रा घेतला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधीची याचिका फेटाळली आहे.

Dhangar Samaj Reservation
loksabha Election 2024 : निवडणूक बंदोबस्त टाळणारा पोलिस निलंबित; १२३ पालिका कर्मचाऱ्यांना नोटिसा

नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव सुहास नाईक यांनी अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने दाखल केलेल्या याचिकेला आव्हान दिले होते.यावर शुक्रवारी (ता.19) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे.

धनगर (Dhangar) समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर मुंबई हायकोर्टात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली होती. हायकोर्टाने राज्यातील एस. टी.आरक्षणापासून प्रवर्गातून आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दर्शवला होता. तोच निकाल आता सुप्रीम कोर्टाने कायम ठेवताना संबंधित याचिका फेटाळली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई उच्च न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आव्हान देत सुहास नाईक यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देत न्यायालयाने धनगर समाजाची याचिका फेटाळली होती. या निर्णयासंदर्भात समाजाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. नाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा कॅव्हेट दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhangar Samaj Reservation
Lok Sabha Election 2024 : आजी-माजी आणि इच्छुकांना 'सतेज' नेतृत्वाची भुरळ; लोकसभेत महापालिकेसाठी फिल्डिंग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com