loksabha Election 2024 : निवडणूक बंदोबस्त टाळणारा पोलिस निलंबित; १२३ पालिका कर्मचाऱ्यांना नोटिसा

Pimpari Mahapalika लोकसभा निवडणुकीच्या विविध कामांत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दोन हजार तीनशे कर्मचारी गुंतले आहेत. त्यातील १२३ जणांनी निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणाला दांडी मारल्याने त्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Police suspened
Police suspenedsarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : लोकसभा निवडणुकीचे कामकाज टाळल्याने होत असलेल्या कारवाईचे लोण आता पिंपरी-चिंचवडपर्यंत आले आहे. आजारी असल्याचा बहाणा करून निव़डणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला न गेलेल्या पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. दुसरीकडे निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणाला दांडी मारलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२३ कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

प्रचंड उष्मा असलेल्या विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लागली. शुक्रवारी त्यासाठी मतदानही झाले. तिकडील बंदोबस्ताकरिता पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयातील पन्नास पोलिसांची ड्यूटी गडचिरोली येथे लावण्यात आली. मात्र,आजारी आहे असे सांगून तिकडे जाणे भूषण अनिल चिंचोलीकर या पोलिसाने टाळले.

त्याचा हा बनाव लक्षात येताच अतिरिक्त पोलिस आय़ुक्त वसंत परदेशी यांनी त्याला निलंबित केले. तो पोलिस मुख्यालयात नेमणुकीस होता. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार 12 ते 19 एप्रिल या कालावधीसाठी ही बंदोबस्त ड्यूटी होती. त्यात चिंचोलीकर होता.

Police suspened
Pimpari Chinchwad Politics : चंद्रकांत नखातेंनी दुसऱ्यांदा वाढवले आमदार जगतापांचे टेन्शन

मात्र, बंदोबस्ताच्या मुख्यालयातील हजेरीला तो गैरहजर होता.आजारी असल्याने फोनवरून त्याने सांगितले. मात्र, त्याचे खोटे कारण समजले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता कामात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवून त्याला तडकाफडकी सस्पेंड करण्यात आले. त्याचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे असल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापालिकेचे सव्वाशे कर्मचारी रडारवर

लोकसभा निवडणुकीच्या विविध कामांत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दोन हजार तीनशे कर्मचारी गुंतले आहेत. त्यातील १२३ जणांनी निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणाला दांडी मारल्याने कारवाई का करू नये अशी विचारणा करणारी नोटीस त्या सर्वांना बजावण्यात आली आहे.

त्यावरील खुलासा न पटणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे,असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (चिंचवड विधानसभा मतदारसंघ) तथा पिंपरी महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी 'सरकारनामा'ला आज सांगितले. गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना नंतर सेवेतून निलंबित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Edited By : Umesh Bambare

R

Police suspened
Gadchiroli Lok Sabha Election 2024: गडचिरोलीत मतदानात घातपाताचा धोका ? राज्य सरकार अलर्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com