Supreme Court on NOTA : बिनविरोध विजयात ‘नोटा’ आडवे येणार? कोर्टाने निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर

Election Commission : नोटासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यालअनुषंगाने कोर्टाने आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
Supreme Court on NOTA
Supreme Court on NOTASarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज कोर्टात (Supreme Court on NOTA) सुनावणी झाली. निवडणुकीत ‘NOTA’ लाही उमेदवार गृहीत धरावे आणि बिनविरोध निवडीवर निर्बंध आणावेत, अशी मोठी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.

शिव खेडा यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये म्हटले आहे की, नोटालाही एक उमेदवार म्हणून मानायला हवे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर त्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक (Election) घ्यायला हवी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Supreme Court on NOTA
Rahul Gandhi News : मोदी आता घाबरलेत... काही दिवसांत स्टेजवर रडतील!

सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सुरतमधील लोकसभा निवडणुकीचेही (Surat Lok Sabha Constituency) उदाहरण देण्यात आले. एखाद्या उमेदवाराविरोधात इतर उमेदवार अर्ज भरत नसतील किंवा सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार असतील तर ती निवडणूक बिनविरोध घोषित करू नये. कारण निवडणुकीवेळी ईव्हीएमवर नोटाचाही पर्याय उपलब्ध करून दिला जातो. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर निवडणूक लढण्यास बंदी घालावी

एखाद्या उमेदवाला नोटापेक्षाही कमी मते मिळाल्यास त्याच्यावर पाच वर्षे कोणतीही निवडणूक लढण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. नोटालाही एक काल्पनिक उमेदवार गृहीत धरून त्यादृष्टीने त्याचा प्रचारही करायला हवा. या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने कोर्टाने आयोगाकडून उत्तर मागवले आहे.  

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात सर्व याचिका फेटाळून लावल्या आहे. मतपत्रिकांवर पुन्हा मतदान होणार नाही, यापुढील सर्व निवडणुका ईव्हीएमवरच होतील, असे कोर्टाने आज स्पष्ट केले आहे. तसेच ईव्हीएमधील मते आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची शंभर टक्के मोजणी करण्याची मागणीही कोर्टाने फेटाळून लावली आहे.

आज निकाल देताना कोर्टाने महत्त्वाचा आदेशही दिला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्याची मागणी करू शकतात. त्यासाठी संपूर्ण खर्च त्यांनाच करावा लागणार आहे. काही घोळ असल्याचे सिध्द झाल्यास त्यांना पैसे परत दिले जातील, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

R

Supreme Court on NOTA
Lok Sabha Election 2024 : हृदयविकाराचा झटका अन्..! मतदानाच्या रांगेतच डॉक्टरने वाचवले महिलेचे प्राण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com