Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर भाजपला सोमवारी दुसरा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेले पवन सिंह यांनी रविवारी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत भाजपला पहिला धक्का दिला होता. आता सोमवारी आणखी एका नेत्याने उमेदवारी नाकारली आहे. त्यासाठी त्यांनी व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओचे कारण दिले आहे.
भाजपकडून (BJP) शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील बाराबंकी मतदारसंघातून उपेंद्र सिंह रावत (Upendra Singh rawat) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रावत हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदारही आहेत. त्यांच्यावरच भाजपने पुन्हा विश्वास दाखवला होता. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला होता.
व्हिडिओ बनावट असल्याचा दावा करत रावत यांनी पोलिस तक्रारही केली आहे, पण त्यानंतर आज त्यांनी निवडणूक (Election) लढणार नसल्याचे जाहीर केले. याबाबत रावत यांनी एक्स हँडलवरून घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की, माझा एक एडिटेड व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. तो डीपफेक आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केला आहे. त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांना निवेदन केले आहे की, याची चौकशी केली जावी. जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होत नाही, तोपर्यंत सार्वजनिक आयुष्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, सोशल मीडियात एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामधील व्यक्ती रावत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामध्ये एक परदेशी महिलाही दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रावत यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर पक्षाकडून रावत यांचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा होती.
पवन सिंह यांनी घेतली अध्यक्षांची भेट
पवन सिंह (Pawan Singh) यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना बोलावून घेतले होते. आज पवन यांनी नड्डांची भेट घेतली. या भेटीविषयी पवन यांनी माहिती देताना सांगितले की, उमेदवारीबाबत चर्चा झाली. यापुढे जो निर्णय होईल तो आपल्याला सांगितला जाईल.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.