Bhubaneshwar : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता ओडिशातूनही काँग्रेससाठी दिलासादायक बातमी आहे. ओडिशाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर ही त्यांची घरवापसी आहे. त्यांनी 2015 मध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झाले होते.
ओडिशाचे (Odisha) माजी मुख्यमंत्री गिरीधर गमांग (Giridhar Gamang) यांनी बुधवारी काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय खजिनदार अजय माकन व ओडिशा प्रभारी अजॉय कुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा हात धरला. त्यांच्यासोबत माजी खासदार हेमा गमांग, माजी खासदार संजय भोई, मुलगा शिशिर गमांग यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गमांग हे 80 वर्षांचे आहेत. संजय भोई हे 2009 मध्ये खासदार होते. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता.
गमांग हे ओडिशातून कोरापुट क्षेत्रातील प्रमुख आदिवासी नेते आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पक्षात घरवापसी केल्यानंतर ते म्हणाले, काँग्रेस आपल्याला 11 वेळा तिकीट दिले. 11 वर्ष केंद्रात मंत्री राहिलो. सात वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपमध्येही होतो. पण काँग्रेसजवळ जे व्हिजन आहे ते इतर पक्षांमध्ये नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गमांग हे 1972 ते 2004 या काळात नऊ वेळा कोरापुट लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी 1999 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री झाले होते. पण त्यांना केवळ दहा महिन्यांचाच कालावधी मिळाला होता. यादरम्यान त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्याजागी पत्नी हेमा या निवडून आल्या. पण पुन्हा 2004 च्या निवडणुकीत गिरीधर गमांग यांना उमेदवारी मिळाली होती.
2015 मध्ये काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील वर्षी जानेवारी महिन्यातच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षात गेले होते. पण या पक्षाकडे ओडिशासाठी कोणताही प्लॅन नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचे संकेत दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.