NCP MP Mohammad Faizal: राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी कायम

Mohammad Faizal Case : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देत फैजल यांचे संसदेचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mohammad Faizal
Mohammad Faizal Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने खासदार फैजल यांना खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली ३ ऑक्टोबरला दोषी ठरवले होते. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभेतून निलंबन केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देत फैजल यांचे संसदेचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mohammad Faizal
MLA Disqualification Case : शरद पवार गटाला झटका; आमदार अपात्रतेप्रकरणी स्वतंत्र सुनावणीस नकार, शिवसेना-राष्ट्रवादीची एकत्र सुनावणी होणार

मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे लक्षद्वीपचे खासदार आहेत. फैजल यांना 2009 मधील एका खुनाच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली होती. ही शिक्षा आधी सत्र न्यायालयाने ठोठावली होती. त्यानंतर हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला आहे.

एकाच वर्षात दोनदा खासदारकी रद्द झाल्यामुळे मोहम्मद फैजल यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले. यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा सांगितल्याने दोन गटांतील संघर्ष थेट निवडणूक आयोगात पोहाेचला आहे.

यावर पहिली सुनावणीही झाली. आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोहम्मद फैजल यांची खासदारकी पुन्हा मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Edited by Ganesh Thombare

Mohammad Faizal
Mohammad Faizal Case: मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचं लोकसभेतून निलंबन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com