शाळा सुरू केल्याबद्दल सरन्यायाधीशांनी सरकारला झापलं

देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या भीषण समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने कडक पवित्रा घेतला आहे.
CJI N. V. Ramana
CJI N. V. Ramana Sarkarnama

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या (Delhi Pollution) भीषण समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कडक पवित्रा घेतला आहे. मोठी माणसे वर्क फ्रॉम होम करीत असताना मुलांना शाळा सुरू केल्याबद्दल सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (N.V.Ramana) यांनी सरकारला फटकारले. प्रदूषणाच्या समस्येवर केंद्र व दिल्ली सरकार काहीच करीत नसल्याचे ताशेरेही त्यांनी मारले.

दिल्लीतील प्रदूषणामुळे बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. यावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने शाळा सुरू केल्याबद्दल दिल्ली सरकारला खडसावले. न्यायालय म्हणाले की, शहरातील प्रदूषणाची पातळी वाढत असताना शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत आणि लहान मुलांसाठी शाळा तुम्ही सुरू करीत आहात. सरकारी पातळीवर काही उपाययोजना होताना दिसत नाहीत.

CJI N. V. Ramana
मुंबई दौऱ्यामुळे ममता अडचणीत; भाजप नेत्यांची पोलिसांकडे धाव

दिल्लीतील शाळा-महाविद्यालये 29 नव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. प्रदूषणाची पातळी वाढल्याने दिल्ली सरकारने 21 नोव्हेंबरपासून शाळा बंद केल्या होत्या. आता हवेची गुणवत्ता सुधारत असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील, असे सरकारने जाहीर केले होते. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा वर्क फ्रॉम होमचा आदेशही मागे घेण्यात येईल, असे म्हटले होते.

CJI N. V. Ramana
सरकारशी पंगा परमबीरसिंह यांना महागात; अखेर झाले निलंबित

मागील सुनावणीवेळी सरन्यायाधीश रमणा म्हणाले होते की, प्रदूषणाच्या समस्येवर उपायांबाबत जनेतच्या अनेक अपेक्षा आहेत. न्यायालये काम करत आहेत आणि सरकार काही करत नाही, अशी भावना आहे. खरी समस्या हीच आहे. न्यायालयाच्या उपाययोजनांनंतर प्रदूषणाची पातळी 40 टक्क्यांनी घटल्याच्या बातम्या आल्या असून, त्यातील सत्यता माहिती नाही. मात्र या मुद्यावर आम्ही सुनावणी कायम ठेवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com