Swami Anand Swaroop  Raj Thackeray Uddhav Thackeray
Swami Anand Swaroop Raj Thackeray Uddhav Thackeraysarkarnama

Anand Swaroop Challeng Raj Thackeray : 'राज-उद्धव ठाकरेची औकात नाही, मुंबईत येऊन हिंदीत...', स्वामी आनंद स्वरुपचे खुले चॅलेंज

Swami Anand Swaroop Raj Thackeray Uddhav Thackeray :उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या दोन छोट्या गँग आहेत. ते सत्तेपासून कोसो दूर आहेत. त्यांच्या हिंमत नाही, अशी टीका स्वामी स्वरुप आनंद यांनी केली.
Published on

Anand Swaroop Challeng Thackeray Brother : हिंदीचा पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्यास राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. सरकारने तो जीआर देखील रद्द केला. हिंदीला विरोधत करत ठाकरे बंधु आज वरळीतील डोममध्ये जाहीर सभा घेत आहेत. मात्र, ठाकरे बंधुंच्या भूमिकेवर उत्तरेतील भाजप नेते टीका करत आहेत. त्यातच स्वीमी आनंद स्वरुप यांनी व्हिडिओ करत ठाकरे बंधुंना ओपन चॅलेंज दिले आहे.

राज-उद्धव ठाकरे यांची औकात नाही. मी मुंबईला येतोय आणि हिंदीतून बोलणार तुमच्यात हिंमत असेल तर मला आडवून दाखवला. गरीब मजूरांना हात लावता. मला हात लावला तर तो हात जागेवर राहणार नाही. उखडून फेकून देऊ, असे आव्हान देखील स्वामी आनंद स्वरुप यांनी दिले आहे.

ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या दोन छोट्या गँग आहेत. ते सत्तेपासून कोसो दूर आहेत. त्यांच्या हिंमत नाही की मुस्लिमांना म्हणतील की तुम्ही अजाना अरबीतून नाही तर हिंदीतून द्या. यांची आकौत नाही. जे गरीब मजदूर दोन हजार किलोमीटर दूर मुंबईत येतात. आपली उपजीवेकासाठी राहात त्यांना हे मारहाण करता. त्यांची ही भ्याड कृती आहे.

Swami Anand Swaroop  Raj Thackeray Uddhav Thackeray
Marathi Vijay Melava: स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे मराठी जनांना करताहेत..'चलो वरळी'चे आवाहन

राज ठाकरे सडकछाप गुंडा

भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदल यांनी देखील ट्विट करत राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे हे सडकछाप गुंडे आहे. महाराष्ट्र हा काय त्यांच्या बापाचा आहे का? दोन भाऊ काही कामाचे नाहीत, असे देखील नवीन यांनी म्हटले आहे.

राज-उद्धव काय बोलणार?

विजयी मेळावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित घेत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने मराठी माणूस आणि मराठी भाषेला टार्गेट करणाऱ्या हिंदी भाषिक नेत्यांविषयी ते काय बोलणार याची उत्सुकता मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे.

Swami Anand Swaroop  Raj Thackeray Uddhav Thackeray
Marathi Vijay Melava: मराठीसाठी दोन भाऊ एकत्र येणार, किमान 3 प्रश्नांची उत्तरे आज देतील का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com