Custodial Death : बाप-लेकाच्या ‘मृत्यू कांडा’ची इनसाईड स्टोरी, 'त्या' नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा; एक साक्ष अन् महिला हेड कॉन्स्टेबलचं धाडस

Sathankulam Custodial Death Case : कोरोना लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ‘साथानकुलम कोठडीत’ बाप-लेकाचा अमानुष छळ करण्यात आला. या प्रकरणात ९ पोलिसांना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आता एका महिला हेड कॉन्स्टेबलचं नाव समोर येत आहे.
Sathankulam Custodial Death Case; woman constable revathi
Sathankulam Custodial Death Case; woman constable revathisarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. 2020 मधील कोठडीतील बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा

  2. महिला हेड कॉन्स्टेबल रेवती यांच्या साक्षीमुळे प्रकरण उघडकीस आले

  3. सहा वर्षांच्या न्यायलढ्यानंतर ऐतिहासिक निकाल

Madurai Custodian Case Death : कोरोना लॉकडाऊनच्या काळात बंदचे नियम असताना दुकान उघडत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात तामिळनाडू पोलिसांनी बाप-लेकाला ताब्यात घेत त्यांचा अमानुष छळ केला. त्यांनी जबर मारहाण करण्यात आली ज्यात आधी बाप आणि त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात सहा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाप-लेकाचा कोठडीत अमानुष छळ करणाऱ्या आणि त्यांचा जीव घेणाऱ्या त्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं एकच खळबळ उडाली. ही घटना २०२० मध्ये ही घटना घडली होती.

यानंतर आता या प्रकरणातील इनसाईड स्टोरी समोर येत असून एका महिला पोलिस हेड कॉन्स्टेबलच्या धाडसामुळे ही घटना उघडकीस आल्याचे समोर येत आहे. तर भीती आणि दबावाला न जुमानता या महिला हेड कॉन्स्टेबलनं त्यांनी, या प्रकरणात आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध जाऊन अमानुष छळाचे थरकाप उडवणारे वर्णन करत सीसीटीव्ही फुटेजमधील पोलिस कर्मचाऱ्यांची ओळखही पटवून दिली. यामुळेच या प्रकरणात न्यायालय निकालापर्यंत पोहचलं असून त्या महिला हेड कॉन्स्टेबलचं नाव रेवती असे आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये 18 जून 2020 च्या रात्री बंदचे नियम असताना व्यापारी जयराजन आणि मुलगा बेनिक्स यांनी दुकान उघडे होते. यावेळी तेथे काही कामगार आपल्या कामाची वाट पाहत होते. तेव्हा पोलिसांनी तिथं येत त्यांना शिवीगाळ केली आणि तेथून निघून जायला सांगितलं. जयराजनं पोलिसांची ही शिवीगाळ ऐकली आणि थोडा वेळ मागितला. ज्यानंतर एका पोलीस कॉन्स्टेबलनं ही खबर इतर सहकाऱ्यांना दिली. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जयराजला त्याच्या दुकानातून जबरदस्तीनं पोलीस स्टेशनला नेलं. यानंतर पोलीस स्टेशनला बेनिक्सनंही पोहचला, तसेच त्याने आपल्या वडिलांना सोडून द्यावं अशी पोलिसांना विनंती केली. यावेळी पोलिसांनी बेनिक्सनंला ही कोठीड घेत अत्यंतिक छळ केला. यामध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या.

Sathankulam Custodial Death Case; woman constable revathi
Custodial Death Case : कोठडीतील मृत्यू प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; 9 पोलिसांना मृत्युदंड अन् कुटुंबाला 1.40 कोटी भरपाई

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना कळवतं त्यांचे नवे कपडे घेऊन येण्याच्या सुचना केल्या. तर वैद्यकीय चाचणीनंतर सथानकुलम कोर्टात हजर केले. ज्यानंतर या बाप-लेकाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. पण केविलपट्टीच्या तुरुंगातच या दोघांची तब्येत खूपच बिघडल्यानं कोविलपट्टी सरकारी रुग्णालयात दाखळ केले. जेथे अतिरक्तस्त्रावामुळे बेनिक्सचा मृत्यू झाला. तर जयराजनं यांचाही रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ज्यानंतर या व्यापारी पिता-पुत्रांचा मृत्यूमुळं देशभरातून संताप व्यक्त झाला होता. मोठ्या प्रमाणावर आंदोलनही झाली. तर आता या प्रकरणात सहा वर्षानंतर न्यायालयाने निकाल देत त्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान आता या प्रकरणात महिला हेड कॉन्स्टेबल रेवती यांचा जबाबत महत्वाचा ठरल्याचे समोर आले आहे. तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या भीती आणि दबावाला न जुमानता या प्रकरणात आपल्या सहकाऱ्यांचे छळाचे कांड न्यायालयात उघड केले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील पोलिस कर्मचाऱ्यांची ओळखही पटवून दिली. तर आता त्यांच्या या धाडसामुळेच हा खटला निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.

या घटनेवेळी रेवती स्वतः पोलिस ठाण्यात ड्युटीवर होत्या आणि त्यांनी संपूर्ण घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. यामुळे दोन लहान मुलांची आई असलेल्या रेवती यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सत्य सांगण्याची तयारी दर्शवली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध उभे राहून त्यांनी घटनांचा मिनिटागणिक तपशील न्यायिक दंडाधिकारी एम.एस. भरतदासन तपासासाठी पोलिस ठाण्यात आले असताना मांडला.

यावेळी रेवती यांनी सांगितले की, या घटनेवेळी त्या तः पोलिस ठाण्यात ड्युटीवर होत्या. रात्री सुमारे ८:५० वाजता ठाण्यात त्या पोहोचल्या त्यावेळी त्यांना आतून किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यावेळी ते ९ पोलिस पीडितांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करत होते. ते त्या बाप-लेकाला हातात सापडेल त्या वस्तूंनी मारत होते. त्यावेळी पोलिसांनी पीडितांच्या गुप्तांगांवरही प्रहार केले. काही वेळा मारहाण थांबवून पोलिस मद्यपान करत आणि पुन्हा मारहाण करत होते. तर एका अधिकाऱ्याचा ओरडण्याचा आवाज येत होता.

जेव्हा आत जाऊन पाहिले तर पीडित व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत होती. त्याही स्थितीत पोलिस मारहाण करत होते. इतकेच नव्हे, तर मारहाणीनंतर पीडित व्यक्तीलाच रक्त साफ करण्यास भाग पाडले गेले. यानंतर ते दोघे पीडित अर्धबेशुद्ध झाले. यावेळी रेवती यांनी त्या दोघांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला. ज्याला इतर सहकाऱ्यांनी विरोध केला. तर दोघांना नग्न करून त्यांचे हात बांधले. हे सगळं पाहून त्या आतून खचल्या आणि तेथून आहेर पडल्या.

या सर्व गोष्टी जबाबातून बाहेर आल्या असून आरोपी असणाऱ्या पोलिसांची ओळख मात्र सीसीटीव्हीमुळे उघड झाली. रेवती यांनी केवळ मौखिक साक्ष देत सीसीटीव्ही फुटेजमधील पोलिस कर्मचाऱ्यांची ओळखही पटवून दिली. हिच साक्ष आरोपींविरुद्धचा भक्कम पुरावा ठरली. दरम्यानच्या काळात रेवती यांना प्रचंड दबाव आणि धमक्यांना सामोरे जावे लागले असून त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी गप्प राहण्याचा सल्ला दिला होता.

तरीही त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही. यामुळे त्यांनाच सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त घ्यावा लागला. मात्र सुरुवातीला रेवती स्वाक्षरी करण्यासही घाबरत होत्या. पण मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या सुरक्षेच्या आश्वासनानंतर त्यांनी आपला जबाब नोंदवला. दरम्यान आता रेवती यांनी दाखवलेल्या धाडसामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून ‘कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही’ हा संदेशही अधोरेखित झाला आहे.

Sathankulam Custodial Death Case; woman constable revathi
Maharashtra police drug case : 'अमली'ची गुंगी महागात! राज्य पोलिस दलातील 17 जण बडतर्फ; देवेंद्र फडणवीसांची मोठी माहिती

FAQs :

1. ही घटना कधी घडली होती?
2020 मध्ये कोरोना लॉकडाऊन दरम्यान ही घटना घडली

2. या प्रकरणात कोणाला शिक्षा झाली?
9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली

3. प्रकरण उघड कसे झाले?
महिला हेड कॉन्स्टेबल रेवती यांच्या धाडसी साक्षीमुळे

4. न्यायालयाचा निकाल कधी आला?
सहा वर्षांच्या लढ्यानंतर आता निकाल देण्यात आला

5. या प्रकरणाचे महत्त्व काय आहे?
पोलिस अत्याचाराविरोधात न्याय मिळाल्याचा हा मोठा निर्णय आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com