Gold Ring Scheme : मुख्यमंत्री विजय सरकारचा मोठा निर्णय; सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना भेट देणार सोन्याची अंगठी

Tamil Nadu CM Joseph Vijay Gold Ring Scheme : निवडणुकीतील प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री विजय यांनी ‘मामाची अंगठी’ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Tamil Nadu CM Vijay Thalapathy  Government Gold Ring Scheme
Tamil Nadu CM Vijay Thalapathy Government Gold Ring SchemeSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu Government Gold Ring Scheme : निवडणूक प्रचारातील आश्वासनांची पूर्तता करताना, मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून तमिळनाडूमध्ये द्रविड नेते सी. एन. अण्णादुराई यांची जयंती अर्थात १५ सप्टेंबरपासून ‘मामाची अंगठी’ योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांना एक ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार असून, यासाठी दोन आघाडीच्या सोने व्यावसायिकांकडून १.२८ लाख अंगठ्या मागविण्यात आल्या आहेत. यासाठी तमिळनाडू सरकारने २२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

तमिळनाडूमध्ये एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यापूर्वी विजय यांनी या योजनेची घोषणा केली होती. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढवणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी चार महिन्यांसाठी एक लाखांहून अधिक २२ कॅरेट सोन्याच्या अंगठ्यांची आवश्यकता आहे.

विजय यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच २२ जूनपासून सरकारी रुग्णालयांत जन्मलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यातील अंगठ्यांची अंतिम किंमत बाजारभावानुसार बदलू शकते. मात्र, प्रचलित बाजारभावानुसार सोन्याची किंमत देण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे.

Tamil Nadu CM Vijay Thalapathy  Government Gold Ring Scheme
CM Joseph Vijay And LTTE controversy : प्रभाकरनच्या स्मरणामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवा वाद; मुख्यमंत्री विजय यांच्या पोस्टवरून भाजप आक्रमक

तामिळनाडू सरकारनं या योजनेसाठी २२० कोटी रुपयांची तरतूद केली असून २२ कॅरेट सोन्याच्या १, २८, ४९९ अंगठ्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारनं या योजनेसाठी एका वर्षासाठी जवळपास ७५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर एका वर्षात ४ लाख ४१ हजार ६६७ सोन्याच्या अंगठ्यांचं वाटप करण्यात येतील असे सरकारचा दावा आहे.

जॉयअलुक्कास, कल्याण ज्वेलरची निवड

‘तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन’ने जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी १, २८, ४९९ सोन्याच्या अंगठ्यांच्या पुरवठ्यासाठी जॉयअलुक्कास आणि कल्याण ज्वेलर्सला ७०:३० या प्रमाणात कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार जॉयअलुक्कास ८९, ९४९, तर कल्याण ज्वेलर्स ३८, ५५० अंगठ्या पुरवणार आहे.

अंगठ्यांचा पुरवठा करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत ११ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. जॉयअलुक्कासने सोन्याच्या एका ग्रॅमच्या किमतीव्यतिरिक्त प्रक्रिया शुल्क, विमा, वाहतूक आणि बीआयएस स्टॅम्पिंगसह इतर सर्व शुल्कांसाठी एक पैसा इतका सर्वांत कमी दर दिला. निविदेतील विजेत्याचा दर संबंधित कायद्यानुसार इतर १० निविदाकारांना कळवण्यात आल्यानंतर कल्याण ज्वेलर्सनेही तोच दर स्वीकारला, असे सरकारने म्हटले आहे.

Tamil Nadu CM Vijay Thalapathy  Government Gold Ring Scheme
Trisha Vijay latest news : अभिनेत्री त्रिशाविषयी अश्लील विधान CM विजय यांच्या जिव्हारी; पोलिसांनी थेट उदयनिधी स्टॅलिन यांना उचललं...

विरोधकांचा आक्षेप

या योजनेच्या निविदेवरून या आठवड्यात विधानसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षांनी निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत यशस्वी निविदाकाराने अतिरिक्त शुल्कासाठी केवळ एक पैसा दर देणे हा ‘अत्यंत असामान्य’ प्रकार असल्याचे म्हटले. विरोधकांनी ही खरेदी तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनमार्फत का करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित केला. या संस्थेची स्थापना प्रामुख्याने औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे आणि आरोग्य सुविधांच्या इमारती बांधण्यासाठी करण्यात आली असल्याचा त्यांचा दावा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com