CM Fadnavis statement : विरोधी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेताच सीएम फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, 'विरोधकांनी कायदा व्यवस्थित समजून घ्यावा'

Devendra Fadnavis News: निवडणूक आयोगाकडे गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीकडून अनेक तक्रारी केल्या जात आहेत. त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाकडे गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीकडून अनेक तक्रारी केल्या जात आहेत. त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले.

सोलापूर-मुंबई विमानसेवेचे लोकार्पण सीएम फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील विरोधक इतके गोंधळलेले कधीच मी पहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा कायदा समजून घेतला पाहिजे. विरोधकांकडून कायदा समजून न घेता नरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Devendra Fadnavis
NCP Politics : अजितदादांनी घातले ठाण्यात लक्ष, आदिती तटकरेंनी दिला खास संदेश; शिंदेंचे टेन्शन वाढणार?

इतके गोंधळलेले विरोधक मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाहीत. इतके मोठे -मोठे लोक त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे? कायदा काय आहे? हे देखील माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही. पण मला वाटतं त्यांना सर्व माहीत आहे, पण केवळ आपण निवडणूक हारलो तर? यासाठी ते आधीच कारणं शोधून ठेवत आहेत, असा खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

Devendra Fadnavis
Ajit Pawar : 'मंत्रालयात बसून प्रश्न कळत नाहीत, त्यासाठी...'; पुणे दौऱ्यावर असलेल्या अजितदादांचा नेत्यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

विरोधक मंगळवारी राज्यात जे निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेले होते. पण ते ज्या अधिकाऱ्यांकडे गेले होते, त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काहीच नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा वेगळा कायदा आहे. त्यातून स्टॅट्यूटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. या इलेक्शन कमिशनबाबतचे सर्व अधिकार कायद्याने त्यांना आहेत, राज्य सरकारला देखील नाहीत, असे सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Uddhav Thackeray: दिवे 'मनसे' लावणार, उद्घाटन 'शिवसेना' करणार : ठाकरे बंधूंच्या 'मिले सूर मेरा तुम्हारा'चा आणखी एक अध्याय

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळणार आहे. या निवडणुकीत महायुतीमधील तीन पक्षाचे उमेदवार मोठया संख्येने निवडून येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही विरोधकांच्या वक्त्यावर हसावे की रडावे हेच कळत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Devendra Fadnavis
BJP Haveli Taluka: पूर्व हवेलीत भाजपाला नवे बळ; एकाच वेळी 100 जणांचा प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com