Durai Murugan : “उत्तर भारतीयांनी 17, 18 मुलं जन्माला घातली”, तमिळनाडूच्या मंत्र्याचं विधान; महिलांवरही वादग्रस्त वक्तव्य

Durai Murugan News : तमिळनाडूच्या एका मंत्र्याचे विधान सध्या वादग्रस्त ठरले असून त्यांनी उत्तर भारतीयांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
DMK leader Durai Murugan
DMK leader Durai Murugansarkarnama
Published on
Updated on

DMK Minister Durai Murugan : तमिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद पाहायला मिळत आहे. आताही केंद्र आणि तमिळनाडू सरकारमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून वाद वाढलेला आहे. अशातच उत्तर भारत व दक्षिण भारतीय लोकांमध्ये मोठी दरी निर्माण करणारे वक्तव्य तमिळनाडू सरकारमधील (द्रमुक) वरिष्ठ मंत्री दुराई मुरुगन यांनी केलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून त्यांनी उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय दुसरं काही कामं नाही, असे म्हटलं आहे.

केंद्र व तमिळनाडू सरकारमध्ये सध्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे दोन्हीकडील नेते एकमेकांवर चिखल फेक करताना दिसत आहेत. याचदरम्यान मंत्री दुराई मुरुगन यांनी वेल्लोरे येथील एका सभेला संबोधित करताना, उत्तर भारत व दक्षिण भारतीय लोकांमध्ये तुलना केली आहे. यामुळे आता नवा वाद सुरू झाला असून जोरदार वार-पलटवार पाहायला मिळत आहेत.

दुराई मुरुगन यांनी, “उत्तर भारतीय संस्कृतीत महिलांना 5-10 पुरुषांशी विवाह करण्याची परवानगी असून आपली (द्रविड) अशी संस्कृती नाही. आपली संस्कृती (तमिळ) त्यांच्यापेक्षा उत्तम आहे. त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा विपरित असून ती बहुविवाहांसारख्या गोष्टींचं समर्थन करत” असल्याचा दावा दुराई मुरुगन यांनी केला आहे.

DMK leader Durai Murugan
Thalapathy Vijay : थलपती विजयच्या पहिल्या सभेला प्रचंड प्रतिसाद; 'DMK'वर केला गंभीर आरोप!

तसेच उत्तर भारतातील स्त्रियांना त्यांच्या संस्कृतीत 5-10 पुरुषांशी विवाह करण्याची परवानगी आहे. पण तसे आपल्या संस्कृतीत नाही, असे म्हणताना दुराई मुरुगन यांनी, द्रौपदीचं उदाहरण दिले आहे. “द्रौपदीनेदेखील पाच पुरुषांशी विवाह केला होता”, असेही त्यांनी म्हटलं आहे.

'ती' त्यांची संस्कृती

आपलाकडील संस्कृतीत एक पुरुष एका महिलेशी विवाह करू शकतो. पण उत्तर भारतातील महिला 5-10 पुरुषांशी विवाह करू शकतात. यासाठी त्यांची संस्कृती त्यांनी परवानगी देते. तसेच पाच पुरुष एका महिलेशीही विवाह करू शकतात, एक गेल्यावर दुसरा येतो. ही त्यांची संस्कृती आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

DMK leader Durai Murugan
DMK MP Dayanidhi Maran Statement : यूपी-बिहारचे लोक आमच्याकडे शौचालये.. : द्रमुक खासदाराचे वादग्रस्त विधान!

दुसरी काही कामं नाहीत

दरम्यान दुराई मुरुगन यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या सुचनेवरून केंद्रासर उत्तर भारतातील लोकांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी एकीकडे केंद्रात सत्तेत असलेले लोक आम्हाला लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या सूचना करतात. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत आहोत. लोकसंख्या नियंत्रित केली. मात्र दुसरीकडे उत्तर भारतीयांनी 17, 18 मुलं जन्माला घातली. त्यांच्याकडे याशिवाय दुसरे कामचं नाही, अशी टीका देखील केली आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com