

Tamil Nadu governor news : तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे १०८ आमदार निवडून येऊनही राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडून त्यांना सत्तास्थापनेसाठी बोलावविले गेले नाही. पक्षाचे प्रमुख विजय यांनी त्यासाठी दोनदा राज्यपालांची भेट घेतली. पण राज्यपाल ११८ या आकड्यावर ठाम आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी सर्व चर्चांना सडेतोड उत्तरे दिली आहे.
राज्यपाल अर्लेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, मी सत्तास्थापनेपासून कोणालाही थांबवत नाही किंवा अडवत नाही, मी फक्त लोकशाहीचा पुरस्कार करतोय. कोणत्याही पक्षाकडे कितीही आमदार असू देत, मला हेडकाऊंडशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं.
विजय यांनी फक्त मला 118 आमदारांचा पाठिंबा आहे, एवढं सांगावं, मी खात्री करेन आणि लगेच शपथ देईन, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. डीएमके-अण्णाद्रमुक एकत्र आले आणि त्यांनी बहुमत दाखवलं तर त्यांनाही संधी द्याल का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कोणीही एकत्र आले आणि नंबर्स दाखवले तरी मला हरकत नाही.
वेळ लागतोय म्हणून काही आमदारांचा घोडेबाजार होईल. पण अस्थिर सरकारला मी परवानगी देणार देणार. आज-उद्या जो काही आमदारांचा घोडेबाजार झाला तर त्याच्याशी माझं देणंघेणं नाही. पुढचे २-३ दिवस कोणी आले नाही आणि विजय यांच्याकडे 118 आमदार नसतील, तर इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. त्यावर अजून विचार केला नाहीय, पण कायदेशीर बाजू समजूनच निर्णय घेणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
दरम्यान, राज्यपालांकडून विजय यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले जात नसल्याने काँग्रेससह टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन केले. काँग्रेसचे नेते अधिक आक्रमक झाले असून त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपाल दिल्लीचे ऐकत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. डाव्या पक्षांकडूनही राज्यपालांनी विजय यांना संधी देण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.