BCCI Head Coach Selection : देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून (BCCI) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशातील निवडणूक फिवर क्रिकेटच्या मैदानावर दिसू लागला आहे. पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) शपथ घेतील, असा विश्वास भाजपमधील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर क्रिकेटमध्ये मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी (Team India Head Coach Update) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंह धोनी यांच्यासह अनेक बड्या क्रिकेटपटूंच्या अर्जांचा पाऊस पडत आहे. अर्थात मोदींसह शाह, सचिन, धोनीच्या नावाने अर्ज बोगस आहेत. 'बीसीसीआय'कडूनही हे अर्ज बोगस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (BCCI Head Coach)
'बीसीसीआय'ने टीम इंडियाच्या मुख्य कोचसाठी 13 मेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास तीन हजारांहून अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये क्रिकेटपटूंसह राजकीय नेत्यांची नावे आहेत. त्यामध्ये सचिन, धोनी, वीरेंद्र सेहवाग, शाहरुख खान, नरेंद्र मोदी, अमित शाह या प्रमुख नावांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या मुख्य कोचची निवड प्रक्रिया सुरू असताना राजकीय मैदानावरही पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले असून सातव्या टप्प्याचे मतदान एक जूनला आहे. तर मतमोजणी चार जूनला आहे. त्यासाठी आता केवळ सहा दिवसांचा कालावधी उरला आहे.
भाजपसह (BJP) काँग्रेसकडून (Congress) आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला जात आहे. मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. तर इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. आघाडीची एक जूनला महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान पदाच्या नावाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.