Bihar election 2025 : बिहार निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार घेणार मोठा निर्णय; महाराष्ट्र, झारखंडमध्ये गेमचेंजर ठरलेली 'ही' योजना राबविणार ?

Ladki Bahin yojna News : एनडीएने आगामी काळात होत असलेली निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी वेगळी रणनीती आखली असून येत्या काळात महाराष्ट्र, झारखंडमध्ये गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना महिलासाठी राबविण्याची तयारी सुरु केली असल्याचे समजते.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Patana News : बिहारमध्ये या वर्षअखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी बिहारमधील सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाप्रणीत एनडीए व काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. एनडीएने आगामी काळात होत असलेली निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी वेगळी रणनीती आखली असून येत्या काळात महाराष्ट्र, झारखंडमध्ये गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना महिलासाठी राबविण्याची तयारी सुरु केली असल्याचे समजते.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या दोन्ही ठिकाणी राबविण्यात आलेली लाडकी बहीण योजना उपुयक्त ठरली. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे सरकार या योजनेमुळे बदलले नाही. आता तोच फॉर्म्युला दिल्लीत आम आदमी (AAP) पक्ष तर बिहारमध्ये एनडीए आघाडी राबविणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत येथील सत्ताधारी पक्षाने महिलांसाठी विशेष योजना राबवल्या होत्या. त्यामुळे दोन्ही राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षालाच जनतेने कौल दिल्याचे दिसून आले.

Nitish Kumar
Santosh Deshmukh Murder Case : बीड सरपंच हत्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले,'आज बोललो तर कुणाचीतरी बदनामी...'

या निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली, तर दुसरीकडे झारखंडमध्ये महिलांसाठी मैय्या सन्मान योजना प्रभावी ठरली. या योजनांचा प्रभावी परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. आता अशाच प्रकारची योजना बिहारमधील एनडीए सरकार बिहार राज्यात आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी बिहारच्या एनडीए सरकारवर दबाव असल्याची चर्चा आहे.

Nitish Kumar
Santosh Deshmukh Murder Case : बीड सरपंच हत्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले,'आज बोललो तर कुणाचीतरी बदनामी...'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) हे रोख रक्कम देणाऱ्या योजनांसाठी फार इच्छुक नाहीत. मात्र, तरीही अशा योजनेची घोषणा करण्यासाठी एनडीएमध्ये चर्चा सुरू आहे. जनता दल (यूनाइटेड) च्या एका वरिष्ठ नेत्याने याबद्दल माहिती दिली “पक्ष, आघाडी आणि सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. जरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे याबाबत फारसे अनुकूल नाहीत. मात्र, या योजना किती लोकप्रिय झाल्या आणि त्यांनी विद्यमान सरकारांना पुन्हा सत्तेत येण्यास कशी मदत केली हे लक्षात घेता अशा योजना राबवाव्या लागतील.” असे एका नेत्याने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.

Nitish Kumar
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख यांच्या भावाने घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट; पथकाकडून 150 जणांची चौकशी

जनता दल (यूनाइटेड) वर विरोधी पक्ष आरजेडीचा दबाव आहे. कारण आरजेडीने आधीच ‘माई बहन मान योजना’ जाहीर केली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून बिहारमध्ये आरजेडी पक्ष सत्तेवर आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना 2,500 रुपये देण्याचे आश्वासन आरजेडीकडून देण्यात आलेलं आहे. दरम्यान, जनता दल (यूनाइटेड) निवडणूक प्रचारात महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करत आहे.

Nitish Kumar
Santosh Deshmukh Case : तपास चक्र फिरली! वाल्मिक कराड नंतर आता CID च्या रडारवर सुदर्शन घुले

दुसरीकडे 2025 मध्ये नितीश कुमार पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास जनता दलला आहे. 22 डिसेंबर रोजी निवडणुकीचे बिगुल वाजवत नारी शक्ती रथयात्रा पक्षाच्यावतीने सुरु करण्यात आलेली आहे. ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जाणार आहे. तसेच महिलांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्व सरकारी योजनांवर प्रकाश या यात्रेच्या माध्यमातून टाकला जात आहे. तरी पण नितीश कुमार यांच्यावर लाडकी बहीण योजना येत्या काळात राबविण्याचा दबाव असणार आहे. त्यामुळे येत्या काळात ते काय निर्णय घेणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे.

Nitish Kumar
Shivsena Ubt News : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का ! गंभीर आरोप करत, ठाकरेंच्या शिलेदारांनी पक्षाला केला जय महाराष्ट्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com