

Tejashwi Yadav News : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची लाट दिसून येत आहे. या लाटेत विरोधी पक्ष काँग्रेस, आरजेडी भुईसपाट झाले आहेत. विशेष म्हणजे राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढत असलेले तेजस्वी यादव हे पराभवाच्या छायेत होते. भाजप उमेदवाराने त्यांना शेवटपर्यंत झुंझवले मात्र त्यांनी 13 हजारांनी निसटता विजय मिळवला आहे.
भाजपच्या सतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना कडवी लढत दिली. मतमोजणीच्या 14 व्या फेरीत त्यांनी सात हजारांची आघाडी घेतली होती. त्यामुळे तेजस्वी यादव पराभूत होतात की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, 17 व्या फेरीत तेजस्वी यांनी सतीश कुमारांना मागे सोडल
17 फेरीत तेजस्वी यादव यांनी दीड हजार मतांची लीड घेतली होती. यी लीड हळूहळू वाढत होती. मात्र, सतीश कुमार हे देखील प्रत्येक फेरीमध्ये चांगली टक्कर देत होते. मात्र, 29 फेरीपर्यंत तेजस्वी यांनी 13 हजारांची आघाडी घेत आपला विजय निश्चित केला.
भाजप 95 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जाऊ शकतो. तर, नितीश कुमार यांच्या पक्षाने 85 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि जेडीयूने प्रत्येक 101 जागा लढल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.