Bihar Political Breaking: बिहारमध्ये 'क्लायमॅक्स' बाकी...! तेजस्वी यादवांची नवी चाल, 'या' नेत्याला CM पदाची ऑफर

Nitish Kumar - Tejaswi Yadav Political News : '...तर आम्ही त्यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवू!'
Tejaswi Yadav, Nitish Kumar
Tejaswi Yadav, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar Political News : बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमारांनी भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एनडीएच सरकार स्थापन झाले. मात्र बिहारमधील कुरघोडीच्या या राजकारणात विधानसभेतील बहुमत चाचणीच्या आकड्यांचा खेळ अजून बाकी आहे. त्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

गेल्याच आठवड्यात संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांसोबत असलेल्या महाआघाडीतून काढता पाय घेतला. त्यानंतर लगेचच 28 जानेवारीला भाजप सोबत हातमिळवणी करून बिहारमध्ये एनडीए सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Tejaswi Yadav, Nitish Kumar
Bihar Politics : नितीश कुमारांचा काँग्रेसला झटका! म्हणाले, "मला काय विचारता, तेजस्वींशी बोला..."

यावेळी त्याच्यासोबत आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळाता भाजपच्या दोन आमदारांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनाराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा हा पक्ष देखील सहभागी आहे.

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मांझी यांनी आता आपल्या चार आमदार असलेल्या HAM पक्षाला दोन मंत्री पदे देण्याची मागणी केली आहे. जीतनराम मांझी यांच्याकडून एनडीएवर दबावतंत्र वापरले जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी यांनी जीतनराम मांझीं(Jitan Ram Manjhi) यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

जर जीतनराम मांझी आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवू,असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बिहारच्या सरकारची बहुमत चाचणी पूर्ण होण्याआधीच काँग्रेसच्या या नवीन ऑफरमुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जीतनराम मांझी यांना काँग्रेसकडून मिळालेल्या या ऑफरचा वापर करून मांझी यांनी एनडीए सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मला महाआघाडीकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे. परंतु मी ती स्वीकारलेली नाही. तसेच एनडीए सरकारमध्ये अपक्ष आमदारांना मागेल ती पदे मिळत असताना आमच्या पक्षाला दोन मंत्रिपदं मिळाली नाही तर आमच्यावर अन्याय होईल. या प्रकरणी मी गृहमंत्री अमित शाह, आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याशी चर्चा केली असल्याचेही मांझी म्हणाले आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांच्यासोबत 8 जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन यांचा देखील समावेश आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच जीतनकुमार यांनी आणखी दोन मंत्रिपदाची मागणी करत सरकारवर दबाव निर्माण केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर राजदचे प्रवक्त मृत्युंजय तिवारी यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. मात्र तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे धक्का तंत्रासाठी ओळखले जातात, त्यांनी यापूर्वीच खेळ अजून संपला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात बिहारच्या राजकारणात आणखी नवा अध्याय पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Tejaswi Yadav, Nitish Kumar
Banner Politics: ‘आम्हाला मत मागायला येऊ नका..!’ अकोल्यात आगळीवेगळी बॅनरबाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com