Prithviraj Chavan News : वजनदार मंत्र्यांपुढंच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कर्जमाफी, अनुदानाबाबत अधिवेशनात आवाज उठवणार

Shambhuraj Desai यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांनी चव्हाण यांच्याशी संवाद साधला.
Shambhuraj Desai, Prithviraj Chavan
Shambhuraj Desai, Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Prithviraj Chavan News : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना राबवली. सरकारचा हा स्तुत्य उपक्रम होता. मात्र, काही कारणांमुळे आमचे सरकार बदलले. त्यानंतर अजूनही या कर्जमाफीपासून सहा लाख शेतकरी वंचित आहेत. त्याचबरोबर ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानही काही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यासंदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या विधानसभा अधिवेशनात त्यावर आवाज उठवणार आहे, असे स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

कराडला यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan कृषी प्रदर्शनाच्या उद्घा‍टनासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan व मान्यवर आले होते. त्यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, हवामान बदलामुळे दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यंदा पाऊस नसल्याने टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

जनावरांच्या छावण्या सुरू केल्या पाहिजे. शासन निर्णय घेईल, त्यावेळी तातडीने छावण्या सुरू झाल्या पाहिजेत अशी व्यवस्था करावी. वनतलावांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. त्यातून शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. मात्र, वन विभाग, पाटबंधारे विभाग, जलसंधारण खाते, पाणीपुरवठा खाते यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही योजना रखडली आहे.

त्यासाठी विशेष धोरण राबवून सर्व अधिकाऱ्यांचा समन्वय साधून वनतलावांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. उसाचा उत्पादन घटल्याने कारखाने १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालतील असे दिसत नाही. उत्पादन वाढण्यासाठी कृषी प्रदर्शनाचा चांगला उपयोग होईल. सारथीच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. रोजगार निर्मिती करण्यामध्ये शासनाकडून प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे तरुणांपुढे रोजगाचा प्रश्न निर्माण झाला आहे. Maharashtra Political News

Shambhuraj Desai, Prithviraj Chavan
Karad Political News : सर्वपक्षीयांनी मोदींवर दबाव टाकल्यास मराठा आरक्षण शक्य : पृथ्वीराज चव्हाण

शासनाने कर्जमाफी योजना राबवली. सरकारचा हा स्तुत्य उपक्रम होता. मात्र, काही कारणांमुळे आमचे सरकार बदलले. त्यानंतर अजूनही या कर्जमाफीपासून सहा लाख शेतकरी वंचित आहेत. त्याचबरोबर ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानही काही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यासंदर्भात निर्णय न झाल्यास येत्या विधानसभा अधिवेशनात आवाज उठवणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Shambhuraj Desai, Prithviraj Chavan
Satara Shivsena News : सातारा लोकसभेवर शिवसेनेचाच हक्क; शिंदे गट आग्रही राहणार : पुरुषोत्तम जाधव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com