Pahalgam Attack Update : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी 22 तारीखच का निवडली? तपासात वेगळीच माहिती आली समोर

Terrorists Chose April 22 for Pahalgam Attack : बैसरण परिसरातील तीन पर्यटन स्थळांची रेकी आंतकवाद्यांकडून करण्यात आली होती. त्यामध्ये अम्युझमेंट पार्कचा देखील समावेश होता.
Pahalgam attack planned for April 22 as terrorists targeted peak tourist flow.
Pahalgam attack planned for April 22 as terrorists targeted peak tourist flow.sarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 पर्यटकांची हत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरक्षा यंत्रणाकडून करण्यात येत आहे. या तपासात या हल्ल्यामागचे पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. आता आंतकवद्यांनी पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी 22 तारीख का निवडली याची माहिती समोर आली आहे.

आतंकवादी हल्ल्याच्या आठ दिवस आधीच पहलगाममध्ये दाखल झाले होते. पर्यटकांची संख्या जिथे जास्त असते त्या बैसरण परिसरातील तीन पर्यटन स्थळांची त्यांनी रेकी देखील केली होती. त्यामध्ये त्यांना पहलगामध्ये पर्यटक जास्त असतात याचा अंदाज आला. त्यामुळे जास्त गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी पहलगामची निवड केली.

Pahalgam attack planned for April 22 as terrorists targeted peak tourist flow.
India Vs Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाचे ढग, पाकिस्तानला 57 मुस्लिम देशांचा पाठिंबा

मीडिया रिपोर्टनुसार, पहलगाम परिसरात 20 आणि 21 एप्रिलला पाऊस झाला होता. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या कमी होती. त्यामुळे 22 एप्रिलला पर्यटकांची गर्दी पाहून आतंकवाद्यांनी हल्ला केल्याची तपासात समोर आले आहे.

अम्युझमेंट पार्कमधील हल्ला टळला

बैसरण परिसरातील तीन पर्यटन स्थळांची रेकी आंतकवाद्यांकडून करण्यात आली होती. त्यामध्ये अम्युझमेंट पार्कचा देखील समावेश होता. आंतकवाद्यांनी तेथे हल्ल्याची देखील तयारी केल्याची माहिती आहे. मात्र, पार्कमध्ये पर्यटकांची संख्या कमी असल्याने येथे हल्ल्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि पर्यटकांची संख्या अधिक असलेल्या पहेलगामची हल्ल्यासाठी निवड करण्यात आली.

अटारी-वाघा सीमा बंद

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिजा तातडीने रद्द करत त्यांना पुन्हा पाकिस्तानला जाण्याचे आदेश दिले होते. अटारी-वाघा सीमेच्या मार्गे भारतात असलेले पाकिस्तानी नागरिक पुन्ह जात होते. आत्तापर्यंत 911 पाकिस्तानी नागरिक या मार्गाने पाकिस्तानात गेल्याची माहिती आहे. आता ही सीमा बंद करण्यात आली आहे.

Pahalgam attack planned for April 22 as terrorists targeted peak tourist flow.
Pahalgam Terror Attack : PM मोदी जाता जाता पाकिस्तानचे 4 तुकडे करतील, पण विरोधकांनी 'तो' मुर्खपणा करू नये...; ठाकरेंच्या सामनातील अग्रलेख चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com