Vijay Thalapathy : CM विजय यांच्या पक्षाचा राहुल गांधींना धक्का; ज्ञानेश कुमारांबाबतच्या भूमिकेने एकजुटीला पहिला हादरा

Thalapathy Vijay INDIA alliance latest news : थलपति विजय यांच्या राजकीय भूमिकेमुळे INDIA आघाडीच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. TVK, काँग्रेस आणि विजय यांच्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Tamil Nadu CM Vijay
Tamil Nadu CM Vijay sarkarnama
Published on: 
Updated on: 

INDIA आघाडीची आज, 30 सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक होत असताना निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यासह अनेक विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, तमिळगा वेत्री कळघम (TVK)चे प्रमुख थलपति विजय यांच्या पक्षाने या मागणीपासून वेगळी भूमिका घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

निवडणूक आयोगाच्या SIR म्हणजेच Special Intensive Revision प्रक्रियेवरून सध्या देशभरात राजकीय वाद सुरू आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा आक्षेप नोंदवले. यामध्ये मतदारांची नावं वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी आणि मतदार डेटाबेसच्या व्यवस्थापनासह काही मुद्द्यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे.

Tamil Nadu CM Vijay
Gyanesh Kumar Big Decision: वाद पेटल्यानंतर निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल; फॉर्म-6 बाबतचा 'हा' नियम अखेर रद्द!

या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आजच्या INDIA आघाडीच्या बैठकीत SIRविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संयुक्त भूमिका ठरवण्याची शक्यता आहे.

मात्र, थलपति विजय यांच्या TVKने ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीला पाठिंबा दिलेला नाही. TVKचे वरिष्ठ नेते आणि तमिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री ए. राजमोहन यांनी स्पष्ट केलं की, एखाद्या व्यक्तीला निवडणूक आयोगाच्या पदावरून हटवल्याने मूळ समस्या सुटणार नाही. TVKचा विरोध व्यक्तीला नसून SIR प्रक्रियेलाच असल्याचं त्यांनी सांगितलं.

राजमोहन यांच्या म्हणण्यानुसार, TVKने सत्तेत येण्यापूर्वीपासूनच SIR प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. मतदार यादीतील बदल आणि मतदारांची नावं वगळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे CECच्या राजीन्याऐवजी SIRमधील कथित त्रुटी आणि मतदार यादीच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका TVKने घेतली आहे.

Tamil Nadu CM Vijay
Government Policy : दुष्काळाची दाहकता! महाराष्ट्रात पहिल्यांदाच वैरण विकास धोरण लागू

दरम्यान, DMK प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे तमिळनाडूतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिका या मुद्द्यावर स्पष्टपणे वेगळ्या दिसत आहेत. INDIA आघाडीच्या बैठकीत या मतभेदांचा आणि SIRविरोधातील पुढील आंदोलनाचा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com