राज्यपालांचा दे धक्का! विधानसभेचे अधिवेशन बोलावले पहाटे दोन वाजता

देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल.
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankharsarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांच्यामध्ये खडाजंगी सुरु आहे. यामुळे राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन (Assembly Session) अचानक तहकुब केले होते. त्यानंतर आता अधिवेशनावरुन पुन्हा एकदा पश्चिम बंगाल (West Bengal) सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आले आहेत. राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन पहाटे २ वाजता सुरु करण्याच्या प्रस्थावाला मंजुरी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Jagdeep Dhankhar
संजय राऊत UP च्या मोहिमेवर; इकडे निकटवर्तीयांना ईडीचा दणका

पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांना समंतीसाठी प्रस्थाव पाठवला होता. त्या प्रस्थावामध्ये टायपिंगच्या चुकीमुळे 7 मार्च (सोमवार) 2 PM ऐवजी 2 AM टाईप करण्यात आले होते. त्या प्रस्थावाला राज्यपालांनी मंजूरी दिली. त्यामुळे आता विधानसभेचे अधिवेशन रात्री 2. 00 वाजता सुरू होणार आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्यासाठी आज राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र उच्चपदस्थ अधिकारी हे राज्यपालांपर्यंत पोहोचले नाही. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, रात्री दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा हा प्रस्ताव त्यांना अनैसर्गिक वाटत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी यावर म्हटले की, ही टाईपिंगची चुकी आहे. राज्यपालांना ती चुक दुरुस्त करता आली असती. मात्र, त्यांनी झालेली चुक मान्य केल्याने आता विधानसभेचे अधिवेशन हे रात्रीच सुरू होणार आहे. बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये ते दुपारी 2:00 वाजता लिहिले होते. मात्र, त्याठीकानी चुकिने पहाटे 2:00 पर्यंत झाले. राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही.

Jagdeep Dhankhar
एका शीख मुलीमुळं मुस्लिम मुलींना मिळाली महाविद्यालयात हिजाबची परवानगी!

त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज पहाटे 2:00 वाजता सुरू झाले, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल. असेही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गुरुवारी, राजभवनाच्या वतीने, मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना राज्यपाल यांनी राज्यघटनेचे कलम 174 अन्वये सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याचे सांगितले आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com