Shiv Sena News : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे. यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी पुन्हा वेग घेणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तब्बल नऊ महिने सुनावणी झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात पाच न्यायामुर्तींच्या खंडपीठाने निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील (Shiv Sena) दोन्ही गटांना नोटीसा पाठवल्या होत्या. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची उत्तर सादर करण्याची मुदत संपणार आहे.
ठराविक कालावधीत आपले उत्तर सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना दिले होते. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी नोटीसीला उत्तर सादर केले होते. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे उत्तर सादर करण्यासाठी वाढीव वेळ मागितला होता.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली होती. ठाकरे गटाच्या आमदारांनी उत्तर सादर केल्यामुळे त्यांनी सुनावणी आधी होण्याची शक्यता आहे. नार्वेकर प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांचीही सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.