Chetan Tupe : मोठी राजकीय घडामोड! अजितदादांच्या आमदारानं घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, ..तर दोन्ही पवार एकत्र येतील!

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार का? या बाबत चर्चा रंगताना पहिला मिळत आहेत
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार का? या बाबत चर्चा रंगताना पहिला मिळत आहेत. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेत. दोन्ही पवारांच्या एकत्र कधी येतील याबाबत भाष्य केले. 

भेटी नंतर माध्यमांशी संवाद साधताना चेतन तुपे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या त्याबाबत आज शरद पवार यांची भेट घेतली. माझ्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यानुसार पश्चिम विभागातील ज्या शाखा आहेत त्याबद्दल ही चर्चा होती. कोणतीही राजकीय चर्चा या बैठकीत झाली नाही . 

रयत शिक्षण संस्थेचे काही कर्मचारी शरद पवार यांच्या भेटीला आले होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी आज पवार साहेबांनी भेटीची वेळ दिली होती. आता वर्ष संपत आहे आणि २०२५ सुरु होत आहे. या वर्षात रयत शिक्षण संस्थेने काही उपक्रम राबवायचे ठरवले आहे, त्याबाबत सकरात्मक चर्चा झाली. 

Ajit Pawar-Sharad Pawar
Kolhapur Politics 2024 : प्रस्थापितांना राजकीय उंची दाखवली, 2024 वर्षाने कोल्हापूरच्या राजकरणात झालेले बदल...

भेट हि फक्त राजकीय कारणासाठीच होऊ शकते असं नाही. माझे आणि साहेबांचे कौटुंबिक संबंध आहेत.  प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये. निवडणूक ह्या फक्त १ महिन्यांसाठी असतात नंतर संबंध जपायचे असतात.  महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजे. 

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का असं विचारलं असता चेतन तुपे म्हणाले, पवार नेहमी सांगत आहेत. दोन्ही पवार एकमेकांना भेटत आहेत, एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्राची इच्छा असेल तर त्या प्रमाणे ते करतील असं चेतन तुपे म्हणले. 

Ajit Pawar-Sharad Pawar
Kolhapur Police News : कोल्हापूर पोलिस ॲक्शन मोडवर! तळीरामांना बसणार चाप!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com