'रूपयाची घसरण नाही, तर डॉलर मजबूत होतोय..' अर्थमंत्र्यांचा युक्तिवाद!

Nirmala Sitaraman : भारताच्या विकासाची कहाणी आणि मजबूत अर्थव्यवस्थेबद्दल सीतारमण यांनी भाष्य केले आहे.
Nirmala Sitaraman Latest News
Nirmala Sitaraman Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

वाशिंग्टन डि सी : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपयाच्या घसरणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भारतीय रुपया घसरत नाही, परंतु अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार परिषदेत बोलताना अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली.

एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, "डॉलर मजबूत होत चालला आहे. त्यामुळे साहजिकच इतर सर्व चलने मजबूत डॉलरच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहेत. मी तांत्रिकतेबद्दल बोलत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की, भारत भारतीय रुपयाला या डॉलर दरवाढीचा सामना करावा लागत आहे. मला वाटते की भारतीय रुपयाने इतर अनेक उभारी घेणाऱ्या बाजारातील इतर चलनांना मागे टाकले आहे."

Nirmala Sitaraman Latest News
Andheri Election : राज ठाकरेंच्या पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया..

सीतारामन म्हणाल्या की, रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आरबीआयचे लक्ष या वस्तुस्थितीवर जास्त आहे की, बाजारात कोणतीही मोठी अस्थिरता नाही. त्यामुळे भारतीय चलन निश्चित करण्यासाठी मध्यवर्ती बँक बाजारात हस्तक्षेप करत नाही. भारताच्या विकासाची कहाणी आणि मजबूत अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी रूपयावर भाष्य केले. रुपया 82.69 च्या आपल्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com