Danish Ali Allegation BJP : त्यांना माझी हत्या करायची आहे; दानिश अलींचा भाजपवर गंभीर आरोप

BJP Politics : रमेश बिधुरी यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे.
Danish Ali Allegation BJP :
Danish Ali Allegation BJP :Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political News : रमेश बिधुरी यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. भाजप आणि दानिश अली यांचे शाब्दिक हल्ले सुरू असतानाच दानिश अली यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केला आहेत. 'मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या लोकांना माझी हत्या करायची आहे. पण भाजप आपल्या खासदारावर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देत आहे, असा आरोप दानिश अली यांनी केला आहे.

इतकेच नव्हे तर माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत की, मी रमेश बिधुरी यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. सर्व काही रेकॉर्डवर आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, ही माझी भाषा नाही. ही भाजपची भाषा आहे.

Danish Ali Allegation BJP :
Sambhajiraje News : अजित पवारांनी विचार बदलला असेल, तर माझं ऐकलं अस समजू!

खासदार दानिश अली म्हणाले , भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. मी लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याची विनंती करेन. मात्र, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हे सर्व तुमच्या शाखांमध्ये शिकवले जात असेल. पण पंतप्रधानांबद्दल चुकीचे बोलल्याचा आरोप तुम्ही करत आहात. मी असे काही बोललो असतो तर भाजपचे खासदार गप्प बसले असते का? ४८ तासांनंतर तुम्ही हा आरोप करत आहात. आपल्या खासदाराच्या चुकीवर पांघरूण घालण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून हे सर्व केले जात आहे.

पण सध्या माझे शाब्दिक लिंचिंग सुरू आहे. खरंतर या लोकांना मला मारायचं आहे. एका ओबीसी व्यक्तीने त्याचे पाय धुऊन घेतले आणि त्यालाच ते पाणी प्यायला दिले. निशिकांत दुबे यांनी केलेले आरोप हे विशेषाधिकार भंगाचे प्रकरण आहे. मी सभापतींना या प्रकरणात लक्ष घालून सत्य परिस्थिती मांडण्याचा आवाहन करेन, असंही दानिश अली यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Danish Ali Allegation BJP :
BJP On Women Reservation : `नारी शक्ती` विधेयकाविरोधात मतदान; ओवेसी, इम्तियाज यांच्यावर भाजपच्या महिला संतापल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com