Political Party Conflict : महिला खासदाराने आपल्याच पक्षाच्या खासदाराला अटक करायला सांगितले! Video, चॅटिंग व्हायरल

Trinamool Congress Internal Conflict Kalyan Banerjee vs Woman MP : कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद आणि त्या महिला खासदारांमधील यांच्यातील वादाने पक्षाच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्याचे समजते.
MP Conflict
MP ConflictSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि त्यांच्याच पक्षाच्या महिला खासदारांमधील वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. तसेच एका व्हॉट्सअप ग्रुपवरील दोन खासदारांमधील चॅटिंगही व्हायरल झाले आहे. त्यामध्ये उल्लेख असलेल्या इंटरनॅशनल लेडीवरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. ही लेडी कोण, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद आणि त्या महिला खासदारांमधील यांच्यातील वादाने पक्षाच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्याचे समजते. त्यांनी दोन्ही नेत्यांना ही स्थिती अधिक बिघडू देऊ नये, असा सल्ला दिला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी व्हिडीओ आणि बॅनर्जी आणि आझाद यांच्यातील व्हॉट्सअप चॅटिंग सोशल मीडियात पोस्ट केले आहे.

MP Conflict
Supreme Court : राज्यपालांच्या अधिकाराबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; देशभरात उमटणार पडसाद

मालवीय यांच्या दाव्यानुसार, संबंधित व्हॉट्सअप ग्रुप टीएमसीच्या खासदारांचा आहे. त्यातील चॅटिंगमध्ये बॅनर्जी यांनी इंटरनॅशनल लेडीचा उल्लेख करत आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दोन्ही नेते 4 एप्रिलला निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जात असताना टीएमसीच्या दोन खासदारांमध्ये वाद झाल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे. मालवीय यांनी वादा व्हिडीओही सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत संबंधित महिला खासदारावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ज्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जायचे होते, त्यावेळी डेरेक ओब्रायन यांना मला एक मेसेज पाठवला की, 27 खासदार निवेदनावर सह्या करतील. मी सकाळी 9.30 वाजता तिथे पोहोचलो.

MP Conflict
Pawan Kalyan : मुलगा आगीत गंभीर जखमी, तरीही पवन कल्याण यांनी आधी आदिवासींना दिलेला शब्द पाळला; आगीचा Video समोर

कार्यालयात पोहचल्यानंतर एका महिला खासदाराने माझ्यावर आरोप केले की, मी त्यांचे नाव शिष्टमंडळात घातले नाही. मी मुद्दा असे केल्याचा आरोप करत त्या ओरडू लागल्या. मग ही प्रत्युत्तर दिले. यादरम्यान त्या तिथल्या बीएसएफ जवानांकडे गेल्या आणि मला अटक करण्यास सांगितले, असा दावा बॅनर्जी यांनी केला.

मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. मी सर्व पक्षांच्या विरोधात लढतोत. पण त्या महिलेकडे राजकारणात मोदी आणि अदानीशिवाय दुसरा मुद्दाच नाही. त्या भाजपच्या कोणत्याही इतर नेत्याला आव्हान देत नाहीत. माझ्या अटकेची मागणी करण्याची हिंमत त्यांनी कशी केली? ममतादीदी म्हणाल्या मी चुकीचा आहे, तर कायमचे राजकारण सोडेन, पण त्या असभ्य महिलेला मान्य करणार नाही, असेही बॅनर्जी यांनी म्हटले. दरम्यान, या वादामुळे आता टीएमसी खासदारांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com