

TMC News : तृणमूल काँग्रेसमध्ये बंड झाले होते. 20 खासदारांनी मूळ पक्षापासून फारकत घेत आपला नवा गट स्थापन केला होता. अखेर हा गट ‘नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया’ (एनसीपीआय) या पक्षात विली झाला आहे. त्रिपुरा राज्यातील असलेल्या या राज्यात तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदास सहभागी झाले तरी त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेतील फूटीनंतर ठाकरे गटाचे वकील असलेले अॅड.असीम सरोदे यांनी पक्षांतर बंदी कायद्याची आठवण करून दिली आहे.सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, 'पक्षांतर बंदी कायदा (10th शेड्युल) नुसार मूळ राजकीय पक्ष जर ठरवेल की इतर पक्षात विलीन व्हायचे आहे तर त्यासाठी त्या पक्षातर्फे निवडून आलेल्या 2/3 सदस्यांची सहमती आवश्यक आहे.'
'अश्यावेळी ज्या उर्वरित सदस्यांना त्या नवीन पक्षात सहभागी व्हायचे नसेल त्यांना अपात्रतेपासून संरक्षण असा नियम आहे. म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचे हा निर्णय मूळ राजकीय पक्षाचाच असला पाहिजे. बंडखोर सदस्य ठरवितात कि आम्ही दुसऱ्या पक्षात विलीन होतोय असे कायद्यात चालत नाहीच त्यामुळे ते अपात्र ठरू शकतात.', असे सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कायदा समजून सांगता सरोदे म्हणाले की, आता हा झाला कायदा. काय सुरु आहे ते आपण बघतोय.संविधान- सूर्याला ग्रहण लागू न देणे त्यासाठी प्रयत्न करणे हे आहे देशप्रेम, असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाच खासदार फुटल्याची चर्चा आहे. मात्र, संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला नऊ खासदार उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे स्वतः संजय देशमुख यांच्याशी सकाळी बोलले आहेत. तसेच इतर दोन खासदारांशी देखील बोलले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.