Om Birla news : शिवसेनेबाबत घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती होणार? लोकसभा अध्यक्ष कुणाला देणार दणका? दिल्लीत मोठी उलथापालथ...

TMC Rebel MPs, Shiv Sena Verdict : तृणमूलला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यानंतर या गटाकडून अधिकृतपणे एनडीएला पाठिंबा जाहीर केला जाईल. तसे संकेत काकोली घोष यांनी यापूर्वी अनेकदा दिले आहेत.
Lok Sabha Speaker Om Birla
Lok Sabha Speaker Om BirlaSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Speaker : दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडींच्या केंद्रस्थानी सध्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे तब्बल २२ खासदारांनी बंड केले आहे. सोमवारी हे सर्वजण बिर्ला यांची भेट घेणार आहेत. आपल्याला गटाला मान्यता देण्याची मागणी ते लोकसभा अध्यक्षांकडे करणार आहेत.

पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे. जवळपास ६० हून अधिक आमदार आणि २२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. दोन तृतियांशपेक्षा अधिक आमदार-खासदार एकत्रित आल्याने पक्षही ममतांच्या हातून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बंगाल विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाला मान्यता दिली असून या गटाच्या नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून निवडही जाहीर केली आहे. आता खासदारही बिर्ला यांच्याकडे अशीच मागणी करणार आहेत. बिर्ला यांच्यासमोर आता जुलै २०२२ मध्ये शिवसेनेबाबत निर्माण झालेली स्थिती असेल.

Lok Sabha Speaker Om Birla
TMC Controversy : खासदार आईवर मद्यप्राशनाचे आरोप, लेक भडकला; माजी मुख्यमंत्र्यांना परत केलं सोन्याचं नेकलेस अन् कुर्ता-पायजमा...

एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० आमदारांसह गुवाहाटी गाठत शिवसेनाचा ताबा घेतला होता. शिवसेनेतील या फुटीनंतर दहा दिवसांतच त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. त्याआधी विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या गटाला मान्यता दिली होती. या घडामोडींनंतर शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांनीही शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या गटाने लोकसभा अध्यक्षांना पक्ष लिहित राहुल शेवाळे यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली.

ओम बिर्ला यांनी या खासदारांची मागणी मान्य करत शिवसेना गटनेतेपदी शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आता तृणमूलबाबतही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बंडखोर गटाकडे दोन तृतियांशहून अधिक खासदार आहेत. त्यांनी स्वतंत्र गटाची मागणी करत काकोली घोष यांना गटनेता करण्याची मागणी केली आहे. सोमवारी खासदारांच्या भेटीनंतर बिर्ला यांच्याकडून तसा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Lok Sabha Speaker Om Birla
Ram Temple Donation Row : राम मंदिरातील दान चोरीने देश हादरला, दोघांना अटक; सरकारला घ्यावा लागला मोठा निर्णय, असे उघडकीस आले प्रकरण...

शिवसेनेबाबत जुलै २०२२ मध्ये घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच बिर्ला यांच्याकडून तृणमूलबाबतही निर्णय घेतला जाणार का, याबबात उत्सुकता वाढली आहे. तृणमूलला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यानंतर या गटाकडून अधिकृतपणे एनडीएला पाठिंबा जाहीर केला जाईल. तसे संकेत काकोली घोष यांनी यापूर्वी अनेकदा दिले आहेत. तृणमूल काँग्रेसने मात्र या गटाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com