महापालिका निवडणुकीत दे धक्का! काँग्रेसला केवळ एक जागा तर भाजपला भोपळा

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) महापालिका निवडणुकांचे (Civic Polls) निकाल जाहीर होत आहेत.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या महापालिका निवडणुकांत (Municipal Election) एकदा तृणमूल काँग्रेसने (TMC) आघाडी घेतली आहे. राज्यात चार महापालिका निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. विधाननगर महापालिकेत (Bidhannagar Municipal Coroporation) तृणमूलने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला (Congress) केवळ एक जागा मिळाला असून, भाजपला (BJP) भोपळाही फोडता आला नाही.

राज्यातील विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोल या चार महापालिकांची निवडणूक 12 फेब्रुवारीला झाली होती. आज या चारही महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. विधाननगरमध्ये 41 पैकी 39 जागा मिळवून तृणमूलने झेंडा फडकावला आहे. याचवेळी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला या महापालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. याचबरोबर एक अपक्ष निवडून आला आहे. दरम्यान, इतरही तीन महिकांत तृणमूल काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

BJP and Congress
हिजाब बंदीवरून रामकृष्ण आश्रमाच्या स्वामी भावेशानंद यांनी हिंदुत्ववाद्यांना फटकारले...

राज्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने नुकताच कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला होता. कोलकता महापालिकेतील 144 जागांपैकी 134 जागा तृणमूलने जिंकल्या. मागील निवडणुकीपेक्षा पक्षाने दहा जागा जास्त मिळवल्या. त्यामुळे इतर महापालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com