Top Bicycle Countries : जगातील सर्वाधिक सायकल वापरणारे ‘टॉप 10’ देश ; भारत यादीबाहेर की यादीत?

Top10 bicycle usage countries India Out of List : भारतावर मोठे इंधन संकट येऊन ठेपले आहे. PM मोदी यांनी पेट्रोल व डिजेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यादृष्टीने सायकलचा वापर महत्वाचा ठरतो.
Top Bicycle Countries
Top Bicycle Countries Sarkarnama
Published on
Updated on

Top bicycle countries : व्यस्त दैनंदिन प्रवासात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकल हा अत्यंत प्रभावी पर्याय असून पर्यावरणासाठीही ती अत्यंत उपयुक्त मानली जाते. जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक वाहतूक, आरोग्यदायी जीवनशैली आणि इंधन बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

अनेक विकसित देशांनी सायकलला दैनंदिन वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय बनवले असून, त्यासाठी स्वतंत्र सायकल ट्रॅक, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षित वाहतूक धोरणे राबवली आहेत. परंतु सर्वाधिक सायकल वापरणाऱ्या टॉप १० देशांमध्ये भारताचा समावेश दिसत नाही. आज भारतावर येऊन ठेपलंलं इंधन संकट पाहाता सायकलचा वापर वाढवणं गरजेचं बनलं आहे. परंतु त्याआधी गरज आहे ते म्हणजे, सरकारकडून त्यासाठी सुरक्षित वाहतूक धोरण आखणे तसेच त्यासाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा निर्माण करणे व सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची आहे.

1. नेदरलँड्स (Netherlands)

जगातील सर्वाधिक सायकल वापरणाऱ्या टॉप १० देशांचा विचार केल्यास या यादीत युरोपातील नेदरलँड्स (Netherlands) देश पहिल्या क्रंमाकावर आहे. नेदरलँडमध्ये लहान तसेच मोठ्या अंतराच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर सायकलींचा वापर होतो. जगातील सर्वाधिक सायकलस्नेही देश म्हणून नेदरलँड्स ओळखला जातो.

१९११ पासून Netherlands मध्ये लोकसंख्येपेक्षा सायकलींचे प्रमाण अधिक आहे असे काही अहवालामध्ये नमूद आहे. येथे सुमारे २ कोटी ३० लाख सायकली असून त्यात २४ लाख ई-बाईक्सचा समावेश आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमागे सरासरी १.३ सायकली आहेत. जगातील सुमारे २.३ टक्के सायकली नेदरलँड्समध्ये आहेत. देशातील सुमारे २८ टक्के प्रवास सायकलद्वारे केला जातो. सायकलसाठी स्वतंत्र रस्ते, पार्किंग आणि विविध योजना राबवून सरकारने सायकल संस्कृतीला मोठे प्रोत्साहन दिले आहे.

Top Bicycle Countries
Kerala CM : केरळचे नवे मुख्यमंत्री ठरले! 'या' नेत्याच्या नावाची घोषणा, राहुल गांधींचे धक्कातंत्र

२. डेन्मार्क Denmark

डेन्मार्कमध्ये सायकल हा अत्यंत लोकप्रिय वाहतुकीचा पर्याय आहे. कामावर जाणे, शाळा किंवा दैनंदिन कामांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर सायकली वापरतात. “डेन्स लोक जन्मतःच सायकलवर असतात,” असेही म्हटले जाते.

देशातील सुमारे १८ टक्के प्रवास सायकलीवर केला जातो. राजधानी कोपनहेगनला (Copenhagen) जगातील सर्वाधिक सायकलस्नेही शहरांपैकी एक मानले जाते. सरकारने सायकल ट्रॅक, पूल आणि पार्किंगवर मोठी गुंतवणूक केली आहे.

३. जर्मनी Germany

जर्मनीमध्ये सायकल संस्कृती अत्यंत मजबूत आहे. २०२१ पर्यंत देशात सुमारे ८.१ कोटी सायकली असल्याचा अंदाज आहे. प्रवास आणि मनोरंजनासाठी सायकलींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

जर्मनीतील सुमारे ९ टक्के प्रवास सायकलद्वारे केला जातो. “डॉइचलंड टूर” ही प्रसिद्ध सायकल स्पर्धा येथे आयोजित केली जाते. तसेच “रोमँटिक रोड” आणि “बर्लिन वॉल ट्रेल” यांसारखे लोकप्रिय सायकल मार्गही येथे आहेत.

४. स्वीडन Sweden

स्वीडनमध्ये सायकल हा टीव्हीइतकाच आवश्यक घटक मानला जातो. देशातील सुमारे ६४ टक्के लोक सायकल चालवतात. स्टॉकहोम, गोथेनबर्ग आणि माल्मो यांसारख्या शहरांमध्ये सायकल ट्रॅक, पार्किंग आणि भाडेतत्त्वावरील सायकलींची सुविधा उपलब्ध आहे.

५. नॉर्वे Norway

नॉर्वेमध्ये गेल्या काही वर्षांत सायकल वापरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील ६१ टक्के लोक सायकलस्वार आहेत. विशेषतः ई-बाईक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी तो अधिक सोयीस्कर पर्याय ठरत आहे.

६. फिनलंड Finland

फिनलंडमध्ये सुमारे १४ टक्के प्रवास सायकलद्वारे होतात. देशाने सायकलस्वारांसाठी स्वतंत्र रस्ते आणि सुविधा विकसित केल्या आहेत. नैसर्गिक सौंदर्य आणि विस्तीर्ण मोकळी मैदाने यामुळे येथे सायकल पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ओउलू शहरात प्रत्येक पाचपैकी एक प्रवास सायकलने केला जातो.

७. जपान Japan

जपानमध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये सायकलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कमी खर्चिक, आरोग्यदायी आणि सोयीस्कर वाहतुकीचा पर्याय म्हणून नागरिक सायकलला पसंती देतात. २०२२ मध्ये जपानमध्ये सुमारे १५ लाख सायकली विकल्या गेल्या. “शिमानामी कैदो” आणि “टूर ऑफ जपान” या सायकल स्पर्धा जगभरात प्रसिद्ध आहेत.

८. स्वित्झर्लंड Switzerland

स्वित्झर्लंडमध्ये मनोरंजन आणि पर्यटनासाठी सायकलिंग लोकप्रिय आहे. देशात १२ हजार किलोमीटरहून अधिक सायकल मार्ग आहेत. ई-बाईक्सची लोकप्रियता येथे झपाट्याने वाढत असून वयोवृद्ध नागरिकही मोठ्या प्रमाणावर त्यांचा वापर करतात.

Top Bicycle Countries
Sugar Export Ban : मोदी सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर बंदी : देशातील साखर उद्योगाला मोठा धक्का; भाव पडण्याचा धोका

९. बेल्जियम Belgium

बेल्जियममध्ये सायकलिंग हा राष्ट्रीय खेळ मानला जातो. देशातील सुमारे ८ टक्के प्रवास सायकलने होतात. ब्रुसेल्स आणि अँटवर्पसारख्या शहरांमध्ये सायकलसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. एडी मर्क्ससारखे दिग्गज सायकलपटू बेल्जियमने दिले आहेत.

१०. चीन China

“सायकलींचे साम्राज्य” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये जवळपास ५० कोटी सायकली आहेत. शहरी भागांमध्ये सायकल हे महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. शांघाय शहरात सुमारे ६० टक्के सायकलस्वार दररोज सायकल वापरतात. चीनमध्ये बाईक-शेअरिंग योजनांनाही मोठी लोकप्रियता मिळत आहे.

Top Bicycle Countries
MSP Hike for Kharif Crops : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; शेतकऱ्यांची दिवाळी!

भारतात सायकल वापर वाढवण्यासाठी सरकारला काय करता येईल?

१. प्रत्येक शहरात स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारावेत

सुरक्षित आणि स्वतंत्र सायकल मार्ग उपलब्ध झाल्यास नागरिकांचा सायकल वापरावर विश्वास वाढेल. मोठ्या शहरांसह मध्यम शहरांमध्येही सायकलसाठी स्वतंत्र लेन तयार करणे आवश्यक आहे.

२. सायकल खरेदीवर अनुदान व करसवलत द्यावी

इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणेच सायकल खरेदीसाठीही सरकारने आर्थिक प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि महिलांना विशेष सवलत योजना लागू करता येतील.

३. सार्वजनिक बाईक-शेअरिंग योजना सुरू कराव्यात

मेट्रो, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांजवळ भाडेतत्त्वावरील सायकली उपलब्ध करून दिल्यास नागरिक छोट्या अंतरासाठी सायकलचा अधिक वापर करतील.

४. सायकलस्नेही शहर धोरण लागू करावे

नवीन रस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि नगररचना करताना सायकलला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पार्किंग, सिग्नल आणि सुरक्षितता यामध्ये सायकलस्वारांसाठी विशेष सुविधा द्याव्यात.

५. शाळा आणि कार्यालयांमध्ये सायकल वापराला प्रोत्साहन द्यावे

“सायकल टू स्कूल” आणि “सायकल टू वर्क” मोहिमा राबवून नागरिकांना सायकल वापरासाठी प्रेरित करता येईल. कार्यालयांमध्ये सायकल पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्यास वापर वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com