Kerala CM : केरळचे नवे मुख्यमंत्री ठरले! 'या' नेत्याच्या नावाची घोषणा, राहुल गांधींचे धक्कातंत्र

VD Satheesan Kerala CM Congress : राहुल गांधी यांनी धक्कातंत्र देत मुख्यमंत्रि‍पदासाठी व्ही डी सतीशन यांच्या नावाला पसंती दिली आहे. काँग्रेसकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
VD Satheesan Kerala CM
VD Satheesan Kerala CM sarkarnama
Published on
Updated on

Kerala CM : केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या 10 दिवसानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. राहुल गांधींनी धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रिपदासाठी व्ही डी सतीशन यांच्या नावाला पसंती दिली आहे.

व्ही डी सतीशन हे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या नावासाठी काँग्रेस आघाडीतील पक्षांनी देखील आग्रह धरला होता. अखेर त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

मुख्यमंत्रि‍पदासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांचे नाव आघाडीवर होते. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र, विधानसभा निवडणूक ज्यांच्या नेतृत्वात लढण्यात आली त्या व्ही डी सतीश यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सतीशन यांना प्रशासकीय अनुभव नसल्याने त्यांच्या नावाला विरोध करण्यात येत होता. मात्र, एका मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण दिले होते. मुख्यमंत्री होण्याआधी मोदी यांना देखील प्रशासकीय अनुभव नव्हता असे त्यांनी म्हटले होते.

केरळ विधानसभा निवडुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाले होते. 140 जागा असलेल्या या विधानसभेत काँग्रेस आघाडीला तब्बल 102 जागा मिळावत मागील दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला.

VD Satheesan Kerala CM
Congress Politics: केरळ काँग्रेसमध्ये वादाचा भडका, 10 दिवस उलटूनही CM पदाचा चेहरा ठरेना; 'हायकमांड'ची 'चॉईस'ही नाकारली?

वेणूगोपाल यांना मोठी जबाबदारी मिळणार?

मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसच्या निरीक्षकांनी आमदारांचे मत जाणून घेतले होते. त्यामध्ये सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली होती. त्यामुळे वेणूगोपाल हे पुढील मुख्यमंत्री असतील अशी चर्चा होती. मात्र, विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या सतीशन यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे.

वेणूगोपाल हे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला म्हणून त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये खर्गे यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

VD Satheesan Kerala CM
Kerala Election Results : काँग्रेस मोठा डाव खेळणार, सत्तेत आलेल्या राज्याचा मुख्यमंत्री ठरला! दिल्लीतील नेत्यावर मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com