मोठी घडामोड : मुख्यमंत्री पहिल्यांदाच निवडणूक लढवणार; भाजपनं कसली कंबर

मुख्यमंत्री पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

आगरतळा : त्रिपुराच्या (Tripura) मुख्यमंत्री पदावरून विप्लवकुमार देव (Biplab Kumar Deb) यांना डच्चू देऊन भाजपनं (BJP) डॉ.माणिक साहा (Manik Saha) यांची निवड केली होती. मागील महिन्यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली होती. त्यांना या पदावर कायम राहण्यासाठी विधानसभेवर निवडून येणं गरजेचं आहे. त्यामुळे साहा हे आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवणार असून, यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

त्रिपुरात चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील टाऊन बोरडोवली मतदारसंघातून साहा हे मैदानात उतरले आहेत. भाजपने आजच त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. साहा यांच्यासमोर प्रमुख आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे असेल. यासोबत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसही या पोटनिवडणुकांत उतरले आहेत. यामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

साहा यांची राजकीय कारकिर्द सुमारे तीन दशकांची आहे. त्यांनी अद्यापपर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही. आता ते पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असल्याने भाजपने या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. साहा राज्यसभा सदस्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आहे. या पदावर कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाणं आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ते मैदानात उतरले आहेत.

BJP
केंद्रीय मंत्रिमंडळातून नक्वींना डच्चू? एकमेव मुस्लिम चेहराही 'आऊट' होण्याची चिन्हे

खासदार डाॅ. साहा यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करुन भाजपने धक्कातंत्र वापरलं होतं. डाॅ. साहा मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी जोडले गेले होते. ते मागील एप्रिल महिन्यात राज्यसभा खासदार बनले. यानंतर महिनाभरातच भाजप नेतृत्वाने त्यांची त्रिपुरात मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याची खेळी खेळली. कर्नाटक, उत्तराखंड, गुजरातप्रमाणे भाजपने त्रिपुरात रणनीती आखली. यानंतर केवळ दोघांचा अपवाद वगळता इतर सर्व मंत्रिमंडळ कायम ठेवण्यात आलं होतं.

त्रिपुरात सत्तेत आल्यानंतर देव यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मागील महिन्यात त्यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) आणि भूपेंद्रकुमार यादव राज्यात दाखल झाले होते. यानंतर पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून डॉ. माणिक साहा यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पक्षाने हा निर्णय घेतला.

BJP
शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा गव्हाणेंनी दिला अजितदादांना शब्द!

त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. निवडणुकीला सुमारे वर्षभराचा कालावधी असतानाच मुख्यमंत्रिपदावरून देव यांना हटवण्यात आलं. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वानं हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी देव यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्याचवेळी देव यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com