जुळ्या भावांचा कोरोनामुळे काही तासांच्या अंतराने मृत्यू

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला असली तरी मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत.
twin brothers died of covid 19 with hours in meerut uttar pradesh
twin brothers died of covid 19 with hours in meerut uttar pradesh
Published on: 
Updated on: 

मेरठ : जोफ्रेड आणि राल्फ्रेड ग्रेगरी या दोघांचा जन्म 23 एप्रिल 1997 रोजी झाला. या जुळ्या भावांनी नुकताच 24 एप्रिलला वाढदिवस साजरा केला. नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. दुर्दैवाने दोघांचाही मागील आठवड्यात काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला. 

ग्रेगरी रेमंड आणि सोजा राफेल या पतीपत्नींना त्यांचा मुलगा जोफ्रेड याचा मृत्यू झाल्याचे 13 मे रोजी कळाले. त्यावेळी त्यांच्यावर आकाशच कोसळले. दोघेही पालक शिक्षक आहेत. काही तासांतच राल्फ्रेड याचाही मृत्यू झाला. परंतु, मृत्यूपूर्वी राल्फ्रेडने घरी फोन करुन त्यांच्या भावाच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यावेळी पालकांनी त्याला दिल्लीतील रुग्णालयात हलवले असल्याचे सांगितले. परंतु, राल्फ्रेडने आई-वडील खोटे बोलत असल्याचे ओळखले होते. माझ्याशी खोटे बोलू नका, असेही त्याने म्हटले होते. 

हे दोघेही भाऊ तीन मिनिटांच्या अंतराने जगात आले होते. सर्व गोष्टी आतापर्यंत त्यांनी एकत्रच केल्या होत्या. दोघांचीही उंची 6 फूट होती. ते कॉलेजलाही एकत्र गेले आणि कोईमतूरमधून त्यांनी बी टेक पूर्ण केले. जोफ्रेड हा अॅक्सेंचर तर राफ्रेड हा ह्युंदाई मुबिस कंपनीत काम करीत होता. जोफ्रेड हा मेरठमध्येच राहत होता आणि घरुनच काम करीत होता. राफ्रेड हा हाताला दुखापत झाल्याने हैदराबादमधून सुटीवर आला होता. दोघांना वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना 1 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 मे रोजी दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला पण तीनच दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. 

देशात 24 तासांत 4 हजार 329 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 63  हजार 533 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 78 हजार 719 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर कालपासून (ता.17 मे) रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com