काँग्रेसला मोठा धक्का! आमदार रामराम करून थेट भाजपमध्ये दाखल

काँग्रेस आणि समाजवादीच्या दोन आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे अनेक पक्षांकडून इतर पक्षांचे आमदार फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. आता काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला असून, काँग्रेसची ताकद आणखी कमी झाली आहे.

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यात काँग्रेसचे सहारणपूरमधील बेहात मतदारसंघाचे आमदार नरेश सैनी, समाजवादी पक्षाचे फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघाचे आमदार हरीओम यादव यांचा समावेश आहे. याचबरोबर समाजवादी पक्षाचे माजी आमदार धर्मपालसिंह यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात झाला.

उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद कमी आहे. यातच आता विद्यमान आमदार पक्ष सोडून गेल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांना रोखण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. राज्यात भाजपला गळती लागली असताना पक्षाने काँग्रेसचे आमदार फोडून धक्का देण्याची खेळी खेळली आहे. भाजपच्या मंत्र्यासह पाच आमदारांनी काल भाजपला रामराम केला आहे. ते लवकरच समाजवादी पक्षात दाखल होणार आहेत.

BJP and Congress
तुमचं अपहरण झालंय का? यावर आमदार फक्त हसले...

दरम्यान, रायबरेलीतील काँग्रेस आमदार आदिती सिंह या नुकत्याच भाजपच्या गोटात सामील झाल्या. विधानसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला पहिला धक्का बसला होता. आदिती सिंह यांनी काही दिवसांपूर्वी थेट पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यावरच हल्लाबोल केला होता. काही काळापासून त्या काँग्रेसवरही टीका करीत होत्या. त्यामुळे त्या पक्ष सोडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ती खरी ठरली आहे. आदिती सिंह यांना मागील वर्षी पक्षाच्या महिला आघाडीतून डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून त्या पक्ष नेतृत्वावर नाराज होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com