Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे गटाचे टेन्शन वाढले; 'आमदार अपात्रता' सुनावणी पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला...

Udhhav Thackeray Vs Eknath Shinde : पुन्हा पुन्हा लांबणीवर पडणाऱ्या निकालामुळे ठाकरे गट अडचणी संपेना...
Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA Disqualification Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार पात्र की अपात्र ? यावर सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागून राहिले होते. मात्र ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे. सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलल्याचे समोर येत आहे. हे प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे समजते. (Latest Marathi News)

Shiv Sena MLA Disqualification
Devendra Fadnavis News : शिवसेना-राष्ट्रवादी आपल्या सोबत तरी 'भाजपच बॉस'; फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ माजणार ?

१६ आमदार पात्र की अपात्र प्रकरणी काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणी लवकर घेण्यास सांगितले होते. विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणी घेण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक तयार केले होते.

Shiv Sena MLA Disqualification
Ramesh Kadam News : जेलमधून बाहेर आलेले माजी आमदार रमेश कदमांना ठाकरे गटाकडून ऑफर; मोहोळ विधानसभेसाठी...

अपात्र आमदारांच्या सुनावणीबाबतीत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टात या प्रकरणी गुरुवारी ६ ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार होती. मात्र, आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com