Devendra Fadnavis News : शिवसेना-राष्ट्रवादी आपल्या सोबत तरी 'भाजपच बॉस'; फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ माजणार ?

Devendra Fadnavis On Mahayuti : स्वतःसाठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्यायला हवेत.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपची दादर येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुखांना मार्गदर्शन केलं. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले. तसेच राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis News: 'मिशन 45' साठी फडणवीसांनी विस्तारकांना सांगितला प्लॅन; म्हणाले, 'पुढील एक वर्षाचा...'

विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं असतं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. शिवसेनेचा नेता मुख्यमंत्री असताना, तीन पक्षांचं एकत्रित सरकार असताना, भाजप हाच बॉस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आगामी काळात खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात परिणामकारक ठरतं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना या वेळी महत्त्वाचे आदेशदेखील दिले आहेत. स्वतःसाठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्यायला हवेत. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना पुढील एक वर्षाचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना दिल्या. यातून भाजपकडून निवडणूक जिंकण्यासाठी ग्रामपातळीवर मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत असल्याचं दिसत आहे.

Devendra Fadnavis News
Ambedkar on Congress-NCP : साखरपुडा झाला; पण ‘ते’ दोन ‘भटजी’ अडथळे आणत आहेत, त्यामुळे प्रसंगी विनालग्नाचे राहू; पण...

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

“आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले असले, तरी राज्यात 'भाजप इज ऑल्वेज बॉस' आहे. युतीमधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे. मी इथं उभा आहे तो पक्षामुळेच. मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहाेचवण्याचे काम करायचे आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांनासुद्धा निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर असेल”, असं फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com