Ujjain Shahi Masjid Controversy : शाही मशिदीवरून वाद पेटला! जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं काय घडलं?

Ujjain Shahi Masjid controversy latest news : उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या भागावरून तणाव निर्माण झाला. रस्ता रुंदीकरणादरम्यान दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.
Ujjain Shahi Masjid Controversy
Ujjain Shahi Masjid Controversy
Published on: 
Updated on: 

Ujjain Shahi Masjid Stone Pelting And Tear Gas Latest News : उज्जैनच्या अब्दालपुरा परिसरातील शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या कारवाईवरून वातावरण चांगलेच तापले आहे. प्रस्तावित कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मशिदीजवळ जमले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावर मुस्लिम समाजातही दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. एका गटाने संबंधित भाग स्वतःहून हटवण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसऱ्या गटाकडून प्रशासनाच्या कारवाईला विरोध केला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शाही मशीद पाडली जाणार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे रविवारी रात्री नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. याचदरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तासह JCB आणि पोकलँड मशीन घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली. आंदोलकांनी प्रशासन आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात सुमारे 2 हजार पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच शाही मशिदीच्या 500 मीटर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, नागरिकांची ये-जा आणि वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे. आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ वातावरण निवळले. मात्र, सोमवारी पुन्हा मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनासाठी जमा झाले. यावेळी संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Ujjain Shahi Masjid Controversy
Ramesh Mhatre news : शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका; जामीन रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा

उज्जैनमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कंठाल चौक ते गोपाल मंदिर या सुमारे 900 मीटर रस्त्याचे 15 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याची योजना आहे. या रस्त्याच्या मार्गात एकूण 7 धार्मिक स्थळे येत होती. त्यापैकी बहुतांश धार्मिक स्थळे परस्पर सहमतीने हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Ujjain Shahi Masjid Controversy
Modi cabinet reshuffle : भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे मोदी मंत्रिमंडळात कमबॅक? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

मात्र, खडे हनुमान मंदिर ते गोपाल मंदिर या मार्गातील एक मस्जिद, खडे हनुमान मंदिर आणि शाही मशीद यांच्यामुळे रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. शाही मशिदीवरील कारवाईला विरोध, पोलिसांवर दगडफेक आणि त्यानंतर अश्रुधुराचा वापर यामुळे उज्जैनमधील परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com