Amit Shah : विरोधकांनी अमित शहांना घेरण्यासाठी सर्व आयुधे काढली बाहेर; 12 पर्यंत अल्टिमेटम अन् संसदेत मोठा प्रस्ताव...

Lok Sabha Rajya Sabha Dr Babasaheb Ambedkar Privilege Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांची पाठराखण करताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घेरण्यासाठी विरोधकांनी सर्व आयुधे बाहेर काढली आहेत. शहांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापलं आहे. काँग्रेसने संसदेत आंदोलन करत अमित शहांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. आता त्यांच्याविरोधात संसदेत विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

अमित शाह यांच्या विधानावरून काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात जय भीमचा नारा देत चर्चेची मागणी केली. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही लावून धरली होती. त्यानंतर संसदेच्या आवारात सर्वच विरोधी पक्षांनी आंदोलनही केले. हे राजकारण सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर पोस्ट करत शहांची पाठराखण केली आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

अमित शहांच्याआधी खर्गेंची पत्रकार परिषद

काँग्रेसकडून अमित शाह यांचा राज्यसभेतील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला जात आहे. तसेच देशात अनेक ठिकाणी आंदोलनही केले जात आहे. यापार्श्वभूमीवर अमित शाह हे स्वत: आज सायंकाळी साडे पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पण त्याआधीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Amit Shah
PM Narendra Modi : शहांच्या बचावासाठी पंतप्रधान मोदी सरसावले; आंबेडकरांवरून सुरू असलेल्या वादात उडी

खर्गे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवरही टीका केली. मोदींनी अमित शहांना जाब विचारण्याऐवजी त्यांची पाठराखण केल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच आज रात्री बारा वाजेपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणीही खर्गे यांनी केली आहे.

Amit Shah
One Nation One Election : पहिल्याच परीक्षेत मोदी सरकार फेल, सर्वात मोठे आव्हान तर पुढे; असा आहे नंबरगेम…

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी लोकसभेत शाह यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रस्ताव राज्यसभा कामकाज नियम 187 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शाह यांच्या राज्यसभेतील मंगळवारच्या विधानाचा संदर्भ देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com